Uncategorized

कारच्या भीषण धडकेत सरसम बु. येथील दोघांचा मृत्यू


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खयुम):

भोकर-हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर सरसम बु. प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ गुरुवारी दुपारी कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गजानन लक्ष्मण पांचाळ (३६) आणि शंकरराव देशमुख बाहेगावकर (५५) या दोघांचा मृत्यू झाला असून सरसम गावावर शोककळा पसरली आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, एम.एच. २६ सी.पी. ५०८० या क्रमांकाच्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की गजानन पांचाळ यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी शंकरराव देशमुख यांना नांदेडला उपचारासाठी नेत असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गजानन पांचाळ यांच्या वडिलांचे अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच निधन झाले होते, त्यातच आता घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
​पोलीस जमादार आऊलवार आणि खान यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या दुःखद घटनेची माहिती मिळताच माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी मृतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button