Uncategorized

पोलीस स्टेशन उमरखेड हददीत मौजे विडूळ येथे अवैध देशी दारु विक्री करणा-या इसमांवर गुन्हा दाखल एकूण 24,800/- मुददेमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई.

सहसंपादक शेख मुजाहिद

यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र, अवैध उत्खन्न सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.

दिनांक 30/01/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात पोलीस स्टेशन उमरखेड हददीत पेट्रोलींग करीत असतांना दुपारी 14/ 30 वाजण्याचे सुमारांस नमूद पथकांस गोपनिय माहीती मिळाली कि, मौजे विडूळ येथील इसम नामे-दिपक किसनराव केंद्रेकर हा त्यांच्या दुकानाच्या पाठीमागे अवैध देशी दारु विक्री करीत आहे अशी माहीती मिळाल्याने नमूद पथकांनी दोन पंचा समक्ष मौजे विडूळ येथे जावून छापा टाकला असता इसम नामे दिपक किसनराव केंद्रेकर वय 56 वर्ष, रा. विडूळ ता.उमरखेड जि. यवतमाळ हा त्याचे दुकानाच्या पाठीमागे अवैध देशी दारु विक्री करीत असतांना मिळून आल्याने त्यांच्या ताब्यातून देशी दारु भिंगरी 180 ML क्षमतेच्या एकूण 310 नग बॉटल प्रत्येकी किंमत 80 /- रु प्रमाणे एकूण 24,800/- रुचा मुददेमाल जप्त करुन इसम नामे दिपक किसनराव केंद्रेकर वय 56 वर्ष, रा.विडूळ ता.उमरखेड जि. यवतमाळ यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन उमरखेड येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हनुमंत गायकवाड सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि/धिरज बांडे, पोउपनि/शरद लोहकरे, सफौ/मुन्ना आडे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, पोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button