शहर
महागाव येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
दि. ३० जानेवारी २०२६ रोजी महागाव येथे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ दुपारी १२:३० वाजता पार पडला.
या श्रद्धांजली कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे सचिव सचिन नाईक, कम्युनिस्ट पक्षाचे डी.बी. नाईक, पंजाबराव गावंडे, महिंद्रा कावळे, राऊत प्रतीक नरवाडे, शंकर नरवाडे, नितीन भुतडा, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन जगदीश नरवाडे यांनी केले होते. उपस्थितांनी पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटांचे मौन पाळत श्रद्धांजली वाहिली.



