आशिर्वादामुळे रेतीतस्कर बलशाली 8 रेती घाटांचे लिलाव होऊन दोन महीने लोटले प्रशासनाकडून लिलावधारकांना ताबा नाही

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड :- सालावादाप्रमाणे याही वर्षी जिल्हा प्रशासनाकडून मिळत असलेल्या सुसंधीमुळे उमरखेड तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रात रेती तस्करांचे प्रस्थ माजले आहे तस्करांप्रमाणेच रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग या उक्तीप्रमाणे प्रशासनातील मोजक्या काही इमानदार अधिकाऱ्यांची अवस्था साप मुंगुसाच्या खेळाप्रमाणे चालू आहे. रात्रंदिवस तस्करांच्या मागावर राहुन त्यांना सळो की पळो करून सोडण्याचा प्रयत्न करीत असले तरी तस्कर राजकिय प्रशासकिय आशिर्वादामुळे मोठे बलशाली बनले असावे की काय असा सवाल सुजाण नागरिक व्यक्त करीत आहेत.
उमरखेड तालुक्यातील पैनगंगा रेती घाटांचा लिलावच होऊ नये अशी प्रार्थना तालुक्यातील रेती तस्कर व त्यांचे मदतगार प्रशासनातील काही अधिकारी राजकीय आका करतात. मात्र यावर्षी तालुक्यातील सावळेश्वर सिंदगी कोपरा दिघडी गुरफळी तिवडी नांदला दिवटपिंपरी या 8 रेती घाटांचे लिलाव होऊन जवळपास 2 महिने लोटत आहेत घाटलिलावधारकांनी प्रशासनाकडे रोख रकमेचा भरणा सुद्धा केला परंतु त्यांना प्रशासनाकडून रेती घाटाचा ताबा का मिळत नाही दबाव असावा की काय त्यामुळेच रेती घाट धारकांना रेती घाटाचा ताबा देण्यास प्रशासन चालढकल करीत असल्याचा दबक्या आवाजात सूर उमटत आहे , प्रशासनातील वरिष्ठावर रेतीमाफी यांचा सध्या पाणी भरपूर असल्यामुळे बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे रेती तस्करांची चांदी होत आहे. जिल्हा प्रशासनाने अधिकृत लिलाव धारकांना उशिराने घाटांचा ताबा दिल्यास तोपर्यंत नदीपात्रामध्ये वाळूचा कणही तस्कर ठेवतात की नाही आमचे लाखो रुपये बुडतील का अशी भीती लिलावधारकांना भेडसावत आहे तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीपात्रातून दररोज लाखो रुपयांची रेती तस्करी होत असताना जिल्हा प्रशासन इतके निपचित कसे पडले असावे असा संतप्त सवालही सुजाण नागरिक व्यक्त करत आहेत.
बॉक्स
मंडळ अधिकाऱ्याची उल्लेखनीय कामगिरी !
आज दि. 23 जानेवारी रोजी भल्या पहाटे 4 वाजताच्या सुमारास गुरफळी रेती घाटातून रेतीचे उत्खनन करून विनापरवाना वाहतूक करतांना एम एच 06 AC 13 57 हे टिप्पर विडूळ जवळ पकडून पुढील दंडात्मक कार्यवाही करीता जप्त करून तहसिल कार्यालय परिसरात जमा केले. सदरची कार्यवाही उपविभागिय अधिकारी सखाराम मुळे, तहसिलदार राजेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी गजानन सुरोशे, वाहनचालक जय महामुने यांनी पार पाडली.



