शहर

महागाव तालुक्यात पीएम किसान योजनेपासून हजारो शेतकरी वंचित; तहसीलवर आंदोलनाचा इशारा


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेपासून हजारो शेतकरी वंचित असल्याचे समोर आले असून, संबंधित विभागांकडून समाधान न मिळाल्यास तहसील कार्यालयावर आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
पीएम किसान योजनेप्रमाणेच महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री कृषी सहायता निधीपासूनही अनेक शेतकरी वंचित असल्याचे आढळून आले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष असून कृषी विभाग व महसूल प्रशासन शेतकऱ्यांचे समाधान करण्यास असमर्थ ठरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सध्या पटवारी व मंडल अधिकारी बेमुदत संपावर गेल्यामुळे शेतकरी तसेच विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जमीनधारणा, दाखले, सातबारा दुरुस्ती, शिष्यवृत्ती व शैक्षणिक कागदपत्रांसह विविध कामे खोळंबली असून कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी वाढली आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी योजनांचा लाभ मिळत नसल्याने शासनाविरोधात संताप व्यक्त होत असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button