Uncategorized

काळे दौलतखान येथे युरिया खत जादा दराने विक्री; कृषी विभागाची कारवाई, परवाना निलंबनाचा प्रस्ताव


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील आज दिनांक 22 -1- 2019 रोजी काळी दौलतखान येथे शेतकऱ्यांकडून युरिया खत जादा दराने विक्री केल्याच्या तक्रारीवरून कृषी विभागाने सलीम कृषी केंद्रावर कारवाई केली आहे. कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष तपासणी करून संबंधित प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला असून, कृषी केंद्राचा परवाना निलंबित केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या खत विक्रेत्यांवर कारवाई झाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत असले तरी तालुक्यातील इतर भागातही गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, फुलसंगी व काळीदौलत परिसरात डुप्लिकेट बियाणे विक्री होत असल्याची माहिती समोर आली असून, सोयाबीन पेरणीदरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या बियाण्यांची उगवण शक्ती कमी असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच आंध्रप्रदेशातून पॅकेज आणून बीटी कॉटन बियाण्याची विक्री केल्याचेही आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत.
या गंभीर प्रकरणांबाबत कृषी विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप असून, कृषी विभाग महागाव यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी खत व बियाणे विक्री केंद्रांची सखोल तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button