शहर

महागाव शहरात बुलेटच्या कर्कश आवाजाचा त्रास; नागरिक हैराण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव शहरात बुलेट मोटारसायकलवरील बदललेले (मॉडिफाइड) सायलेन्सर आणि त्यातून होणाऱ्या कर्कश आवाजामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ व रहदारीच्या भागात मोठ्या आवाजाने धावणाऱ्या बुलेटमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले तसेच व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
विशेषतः व्यापारपेठ परिसरात दिवसभर ये-जा करणाऱ्या बुलेटच्या कर्कश आवाजामुळे दुकानदारांचे व्यवहार विस्कळीत होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आवाजाच्या प्रदूषणामुळे आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याची भीती व्यक्त होत आहे.
पुसद शहरात यापूर्वी अशाच प्रकारे कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटचे सायलेन्सर काढून जप्त करण्यात आले होते व वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. त्याच धर्तीवर महागाव शहरातही पोलिस प्रशासन बुलेटवरील अवैध व मोठा आवाज करणारे सायलेन्सर काढून जप्त करणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
महागाव पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शहरात बुलेटच्या कर्कश आवाजावर तात्काळ बंदी घालावी, धडक कारवाई करून वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व व्यापारी वर्गाकडून जोर धरत आहे. अन्यथा नागरिक आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील का, अशीही चर्चा शहरात सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button