राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी अनिल नाईक; परमेश्वर मंदिरात झाला नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

हिमायतनगर (प्रतिनिधी शेख खयुम खूरेशी ):
राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश या संघटनेच्या वतीने हिमायतनगर तालुका व शहरासाठी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी अनिल नाईक, शहर अध्यक्षपदी शेख मुजम्मिल तर तालुका उपाध्यक्षपदी मनोज तपासकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नूतन कार्यकारिणीचा सत्कार सोहळा स्थानिक परमेश्वर मंदिर येथे उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पुष्पहार घालून गौरव करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती:
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राम नरवाडे आणि पापा पार्डीकर उपस्थित होते. संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष शुद्धोधन हनवते आणि जिल्हा अध्यक्ष देवानंद गुंडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर काम करण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी ही नवी टीम काम करेल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनीव्यक्त केला.फोटो कॅप्शन
हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिरात राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना मराठवाडा अध्यक्ष शुद्धोधन हनवते, जिल्हाध्यक्ष देवानंद गुंडेकर, राम नरवाडे, पापा पार्डीकर व अन्य.



