शहर

रस्त्यावर आढळला इसमाचा मृतदेह इसम मराठवाड्यातील असल्याची ओळख पटली

सहसंपादक शेख मुजाहिद
मरखेड शहरातील नांदेड रस्त्यावरिल भुराजी मेडिकल समोर एका ४० वर्षीय इसमाचा आज सकाळी९ वाजताच्या सुमारास मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर इसम मराठवाडयातील असल्याची ओळख पोलिसांना पटविण्यात यश मिळाले आहे.

रामराव पांडुरंग शिंदे (४०) रा . पळसपुर ता. हिमायतनगर असे निद्रावस्थेत मृत्यू झालेल्या इसमाचे नाव असून मागील आठ दिवसापासून ते घरातून निघून गेले असल्याची माहीती आहे तर काही नातेवाईकांनी सदर इसम हे पुणे येथे कामानिमित्त गेले होते असेही सांगण्यात आले आहे . शहरातील भर रत्यावर एका अनोळखी इसमाचा मृतदेह निद्रा अवस्थेत पाहून बघ्यांनी एकच गर्दी केली होती. यावेळी पोलीस प्रशासनाला तात्काळ बोलून सदर इसमाचा पंचनामा करून येथील उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी सदर इसमास मृत्य घोषित केले. सदर इसमाची ओळख पटविण्याकरिता पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली.

शेवटी तांत्रिक बाबींचा अवलंब करून सदर इसमाची ओळख पटली असून मृतकांच्या नातेवाईकांनी उमरखेड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून मृत्यूचे कारण अद्यापही कळाले नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपींवार व पोलीस कर्मचारी अंकुश दरबस्तेवार करीत आहेत मूर्तकाच्या पश्चात दोन मुलं व एक मुलगी पत्नी असा परिवार असल्याची माहिती मिळाली आहे.

बॉक्स

सेवागार परिचरच (शवविच्छेदकच) नाही !

येथील उपजिल्हा रुग्णालय येथे मागील दोन ते तीन वर्षापासून सेवामार परिचर (शवविच्छेदक) नसल्याने मृतकाच्या नातेवाईकांना तासंतास ताटकळत बसावे लागते. त्यातच ढाणकी येथील एका खाजगी इसमास आणण्याकरिता येथील डॉक्टर व पोलीस कर्मचारी तसेच मृतकाच्या नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागतआहे. या प्रकारामुळे मात्र मृतकांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आहे. त्यामुळे मृतकाचे नातेवाईक संताप व्यक्त करत असून शासनाच्या रुग्णालयावर ताशेरे ओढत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात तातडीने शवविच्छेदक देण्याची मागणी महात्मा फुले दैनिक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संतोष मुडे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button