शहर

प्रभाग क्र. १३ मध्ये २५ मीटर नालीचा प्रश्न मार्गी; सीमा नरवाडेंच्या सामाजिक बांधिलकीचे ठळक उदाहरण


महागाव | प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला २५ मीटर नाली बांधकामाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता, केवळ नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन महागाव खरेदी-विक्री संघाच्या संचालिका सीमा नितीन नरवाडे यांनी स्वखर्चातून हे नालीचे काम पूर्ण करून दिले, ही बाब सामाजिक बांधिलकीचे ठळक उदाहरण ठरत आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत केवळ चार मतांनी पराभव स्वीकारावा लागला असतानाही खचून न जाता, विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य देत समाजकारणाला अग्रक्रम दिल्याचे सीमाताईंनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. या नालीच्या बांधकामामुळे परिसरातील पाणी साचणे, दुर्गंधी तसेच आरोग्यविषयक समस्या कायमस्वरूपी दूर होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विशेष म्हणजे, या कामासाठी महागाव नगरपंचायतीकडून कोणतेही सहकार्य न मिळाल्याचे सांगितले जात असून, तरीही सीमाताईंच्या उदार योगदानातून हे काम प्रत्यक्षात साकार झाले. हे काम पूर्णतः स्वतःच्या खर्चातून करण्यात आल्याने याचे श्रेय घेण्याचा अधिकार कोणालाही नसल्याची चर्चा नागरिकांत होत आहे.
यावेळी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ कदम, खरेदी-विक्री संघाचे संचालक रावसाहेब पाटील नरवाडे, विजयराव कदम, दत्ता बापुराव नरवाडे, विलास देवसरकर, संतोष कोल्हेकर, किसनराव नरवाडे, संतोष पहुरकर, रवी खंदारे, कैलास भरवाडे, सदानंद नरवाडे, गजानन कदम यांच्यासह प्रभागातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button