Uncategorized

जन्मदात्याच पित्याने मृत्यूचा मार्ग दाखवला?हेलियम सिलिंडर, वापराचा व्हिडिओ आणि अखेर तरुणीचा अंत वर्ध्यात खळबळ

सहसंपादक शेख मुजाहिद

  • राजकीय दबावामुळे एफआयआर रखडली? डॉक्टर आईची न्यायासाठी एकाकी लढाई प्रतिनिधी:-
    वडील म्हणजे संरक्षणाची ढाल—मात्र वर्धा जिल्ह्यातील एका प्रकरणात हाच विश्वास चिरडला गेला असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका तरुणीने आत्महत्या केल्याचा दावा असून, जन्मदात्या पित्यानेच आत्महत्येचा मार्ग दाखवून हेलियम गॅसचा सिलिंडर आणून देत वापराचा व्हिडिओ पाठवल्याचा धक्कादायक आरोप मृत तरुणीची आई, डॉ. सुषमा अरुण वानखेडे, यांनी केला आहे. या प्रकरणात राजकीय दबावामुळे पोलिसांनी एफआयआर नोंदवलेली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
    डॉ. सुषमा वानखेडे (रा. ड्रिमझलँड सिटी, सावंगी मेघे, वर्धा) यांच्या माहितीनुसार, त्यांची मुलगी नक्षत्रा अरुण वानखेडे हिने 6 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्री आत्महत्या केली. पती डॉ. अरुण उत्तम वानखेडे, नणंद प्रमिला गजानन विणकरे व रेवती मोहनराव देवतळे यांच्या सततच्या छळामुळे हा टोकाचा निर्णय घ्यावा लागल्याचा दावा आहे.
    आईच्या आरोपांची धार अधिक तीव्र आहे. पतीचे रेवती देवतळे यांच्याशी अनैतिक संबंध असून, त्याला विरोध केल्यामुळे सुषमा व नक्षत्रा या दोघींनाही मारहाण, अपमान आणि मानसिक छळ सहन करावा लागला. “तू कुटुंबासाठी कलंक आहेस, तू मरून जा,” अशा शब्दांत नक्षत्राला वारंवार हिणवले जात होते. या छळाचा कळस म्हणजे—पित्यानेच आत्महत्येचा ‘उपाय’ सांगत सिलिंडर देणे आणि वापराचा व्हिडिओ पाठवणे, असा आरोप आहे. अखेर नक्षत्राने जीवन संपविले.
    पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात
    घटनेनंतर आरोपी पती फरार झाल्याचा दावा आहे. मुलीचे अंत्यसंस्कार डॉ. सुषमा यांनी एकट्याने केले. 16 डिसेंबर 2025 रोजी सावंगी (मेघे) पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करूनही दखलपात्र गुन्हा असूनही एफआयआर नोंद नाही. तपास अधिकारी विशाल डोणेकर व ठाणेदार आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे.
    न्यायासाठी एकाकी झुंज
    डॉ. सुषमा यांनी पोलिस अधीक्षक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच महिला व बालविकास विभागाकडे दाद मागितली आहे. 26 डिसेंबर रोजी एसपींची भेट झाली; मात्र त्या वेळी मोबाईल बाहेर ठेवल्याने ऑडिओ-व्हिडिओ पुरावे सादर करता आले नाहीत. “माझ्याकडे व्हॉट्सअॅप चॅट्ससह ठोस ऑडिओ-व्हिडिओ पुरावे आहेत. निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी,” अशी आर्त मागणी त्यांनी केली.
    निष्पक्ष तपास व दोषींवर कठोर कारवाई
    या प्रकरणातील आरोप अत्यंत गंभीर असून, पोलिस प्रशासनाची पुढील भूमिका आणि कायदेशीर कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button