शहर

एस पी एल एस च्या विद्यार्थ्यांनी समजून घेतले दंत आरोग्याचे महत्त्व


एस पी दळवी
उमरखेड
दिनांक : ०३/०१/२०२६ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच निरोगी आरोग्य व सर्वांगीण कल्याणासाठी कटिबद्ध असलेल्या संस्कार पोदार लर्न स्कूल, उमरखेड येथे दंत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
सदर दंत आरोग्य शिबिरात अनुभवी तज्ञ दंतवैद्य डॉ. आशिष उगले (BDS), डॉ. प्रिया काळे (BDS), डॉ. सुरेखा मस्के (BDS) आणि डॉ. श्रुतिका चव्हाण (BDS)यांनी विद्यार्थ्यांची दंत तपासणी करून तोंडाची स्वच्छता कशी राखावी, योग्य पद्धतीने दात कसे घासावेत तसेच दंत आजारांपासून प्रतिबंध कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत दंत आरोग्याचे महत्त्व समजून घेतले. विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या आरोग्य सवयी रुजवणे व दंत समस्यांचा प्रतिबंध करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आराध्या कदम तर केले आभार प्रदर्शन वृषाली थोटे हिने केले. सदर दंत आरोग्य तपासणी शिबिराचे असे यशस्वी ते करिता संचालक मंडळ, प्रिन्सिपल, प्रशासकीय अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर यांनी मोलाचे सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button