शहर

स्वातंत्र्याच्या दशकांनंतरही ‘हे’ दिन आले! मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी अखेर शिक्षकांनी हातात धरले लेखणीचे हत्यार; हिमायतनगर नगरपंचायतीच्या कारभाराचा पर्दाफाश!


​नव्याने आलेले ‘मुख्य अधिकारी’ तरी लक्ष देणार का? कुत्रे पकडण्याचा निधी जातो कुठे? नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभारावर मोठा खुलासा!
​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):


​देश स्वतंत्र होऊन इतकी वर्षे उलटली, तरीही स्थानिक प्रशासनाला शहरातील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आणि रुग्णांच्या सुरक्षेची शाश्वती देता आलेली नाही. ज्या नगरपंचायतीने मूलभूत सुविधा पुरवणे आणि मोकाट प्राण्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे होते, त्याच प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आज ग्रामीण रुग्णालय परिसर व हाजी आदमजी उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांवर मुख्य अधिकाऱ्यांना २५/०८/२०२६ रोजी थेट लेखी अर्ज देण्याची वेळ आली आहे. नव्याने रुजू झालेले मुख्य अधिकारी तरी या गंभीर समस्येकडे गांभीर्याने पाहणार का, असा रोखठोक सवाल नागरिक विचारत आहेत.
​नगरपंचायतीच्या कारभारावर उठलेले प्रमुख प्रश्न:
​कुत्रे पकडण्याचा निधी कुठे जिरवला? शासनाकडून दरवर्षी शहरात रेबीज नियंत्रण आणि मोकाट प्राण्यांच्या निर्बीजीकरणासाठी स्वतंत्र निधी मंजूर केला जातो. मग हा निधी नक्की जातो कुठे? केवळ कागदावरच मोहिमा दाखवून निधी लाटला जात आहे का?
​ग्रामीण रुग्णालय व शालेय रस्त्यावर दहशत: ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात आणि लहान मुलांच्या येण्या-जाण्याच्या मुख्य रस्त्यावर आवारा कुत्र्यांनी थैमान घातले आहे. रुग्ण, वृद्ध आणि शाळकरी मुलांच्या अंगावर हे पिसाळलेले कुत्रे थेट धावून जात असल्याने मोठी घबराट पसरली आहे.
​ज्ञानदान सोडून शिक्षकांना प्रशासकीय दारी धाव! ज्या शिक्षकांनी वर्गात विद्यार्थ्यांना घडवायचे, त्यांना आज मुलांचा जीव वाचवण्यासाठी नगरपंचायतीच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. हाजी आदमजी उर्दू शाळेच्या प्राचार्यांनी स्वतः सही करून हे पत्र प्रशासनाला दिले असून, शिक्षकांवर ही वेळ येणे अत्यंत लाजीरवाणी बाब आहे.
​एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? नव्याने आलेल्या मुख्य अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताच तात्काळ निधीचा वापर करून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा; अन्यथा नगरपंचायतीविरुद्ध तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पालक व नागरिकांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button