गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती उमरखेड यांचा भोगळा कारभार मुख्याध्यापक अशोक बुरकुळे करतात मांडवली

अल्पसंख्यांक संख्तेला दिला जातो दुचाभाव स्वाक्षरी करण्यासाठी करतात टाळाटाळ
सहसंपादक शेख मुजाहिद
सन 2013 दिनांक 11 / 10 /2013 चा शासन निर्णयानुसार अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक सुविधा साठी डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा अनुकुनीकरण योजना राज्यात राबवली जात आहे . प्रत्येक वर्षी मदरसा व अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था नियोजन कार्यालय मध्ये प्रस्ताव सादर करीत आहे या प्रस्तावासाठी गटशिक्षणाधिकारी साहेबांची स्वाक्षरी अनिवार्य असते यासाठी प्रत्येक मदरसेवाले वारंवार गटशिक्षण अधिकारी साहेबांच्या कार्यालयात चक्कर मारत आहेत कधीही भेट होत नसून दलाल मुख्याध्यापक वरुड बिबि हे नेहमी शाळेकर गैरहजर रहातात आणि तो गटशिक्षणधिकारी कार्यालय मध्ये माझे पद केंद्रप्रमुख असे आहे म्हणून धमकी देत आहे आणि प्रत्येक प्रस्ताव बाबत १० हजार रुपये आम्हाला तुम्ही द्या तेव्हा आम्ही साहेबांना सांगून सही करतो अशी मदरसावाल्यांना मागणी करून धमकी देत आहे गेल्या नऊ वर्षापासून पंचायत समिती कार्यालयामध्ये दलाली चा रोल अदा करीत आहेत आणि शिक्षकाला सुद्धा मराठी माध्यम किंवा उर्दू माध्यमाच्या शिक्षणाला त्रास देत आहे त्यांच्याकडून दलाली घेऊन तडजोड करतात याकरिता अशा दलाल मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांना बडतर्फ करण्यात यावे आणि शासनाच्या निर्णयाचा अपमान करणारे अधिकाऱ्याला सुद्धा बडतर्फी करण्यात यावी अधिकारी व दलाल कर्मचारी यांना कायमस्वरूपी बडतर्फी करून पुढील कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले यावेळी आत्याचार भ्रष्टाचार समिती चे मौलाना मदार शेख , शेख निसार ,मौलाना अक्रम हे उपस्थित होते



