शहर
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना धान्य किट वाटप

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मिशन उभारी अंतर्गत यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात महागाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना धान्य किटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते लाभार्थी कुटुंबांना धान्य किट वितरित करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमासाठी नगरपरिषद उपाध्यक्ष उदय नरवाडे तसेच मित्र मंडळाच्या सहकार्याने ही योजना यशस्वीपणे राबविण्यात आली.
आत्महत्याग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. नवीन वर्षाची सुरुवात सामाजिक कार्यातून व्हावी, असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.



