२००१ चा ऐतिहासिक विजय : जनशक्ती विरुद्ध धनशक्ती. सताधारी भाजपचा पराभव ! उमरखेड नगरपरिषद नगरपदाच्या निवडणुकीत जनशक्ती पॅनल च्या तेजश्री जैन विजयी !

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड : नगरपरिषद च्या पहिल्या टप्यातील पार पडलेल्या निवडणुकीत कॉग्रेस, शिवसेना (उबाठा) प्रणीत जनशक्ती पॅनेलच्या नगरअध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री संतोष जैन हया विजयी झाल्या त्याच्या प्रतीस्पर्धी असलेल्या भाजपा पक्षाच्या उमेदवार निधी नितिन भुतडा हया ९८४ मतांनी पराभुत झाल्या मागील काळात नगरपरिषद मध्ये भाजपची सता असताना या वेळी भाजपा विरुद्ध मतदारांनी मतदान करून २६ जागापैकी १७ जाग्यावर जनशक्ती पॅनेलने नगरअध्यक्ष पदासह उमेदवार निवडून आणत स्पष्ट बहुमत मिळवून घेतले आहे यावेळची पंचवार्षीक निवडणुक सन २००१ ची अपक्षाची पूर्णरावृत्ती ठरली आहे भाजपाला केवळ ९ जागी यावेळच्या निवडणुकीत नगरसेवक निवडूण आणता आले. जनशक्ती पॅनला स्पष्ट बहुमत देत मतदारांनी १३ ही प्रभागात ऐतिहासीक कौल दिला आहे जनशक्ती पॅनलचे उमेदवार संदिप ठाकरे आणि भाजपा उमेदवार सुरेन्द्र कोडगिरवार यांन यांना समान मते मिळाली असल्याने ईश्वर चिठ्ठीत भाजपाचे उमेदवार सुरेन्द्र कोडगिरवार हे विजयी झालेत जनशक्ती पॅनल चे विजयी झालेले नगर सेवक म्हणून अ. गणीशहा अन्वर अलीशाह, फरजाना सै रहिम, नाजेरा परविण शे अकील, मो साजीदुल्ला जागीरदार रुपाली कवाणे, गणेश खंदारे कविता काळबांडे, विरेन्द्र खंदारे, प्रकाश शिकारे स्वाती ठाकरे, राधा इंगोले, गजानन रासकर, वैष्णवी लाहेवार, पठाण शबाना फरिन, शे रसुल शे वाहेद, कुरेशी जुबेर शे सम्मंद आणि मरियम स ईब्राहिम निवडुन आलेत तर भाजपा पक्षाचे विजयी नगरसेवक सुरेन्द्र कोडगिरवार ज्योत्सना रुडे, विजय हरडफकर, वंदना घाडगे, खुषबु मेंढे, अमोल तिवरंगकर, गोपाल कलाने, करुणा कुबडे, भास्कर साधु हे साधु हे निवडुन आलेत निवडणूक निर्णय अधिकारी सखाराम मुळे यांनी काम पाहीले जनशक्ती पॅनेल निवडूण आणण्यासाठी कॉग्रेस पक्षाचे सरचिटणीस साहेबराव कांबळे, तातू देशमुख नंदकिशोर अग्रवाल राम देवसरकर ? ड संतोष सतिष नाईक ?ड बळीराम मुटकुळे जैन शुभाष दिवेकर इन्नाऊला जनाब गोपाळ अग्रवाल दतराव शिंन्दे आदी मान्यवर यांनी परिश्रम घेतले.
निकाल लागताच शहरात मिरवणुक काढली गुलाल उदळून पेढे वाटून जलोष केला त्यावेळी मिरवणुकीत हजारो च्या संख्येने उपस्थिती होती



