अहंकारात भाजपची सीट गेली! नितीन भुतडांच्या ‘हमपणामुळे’ उमरखेडचा विकास खुंटला; जनतेने नगरपालिकेत पायरी दाखवली

उमरखेड प्रतिनिधी
नितीन भुतडांच्या अहमपणामुळेच भारतीय जनता पार्टीला उमरखेड मतदारसंघात मोठा फटका बसल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. विधानसभेत भाजपचे पहिले आमदार राजीव नजरधने ठरले; दुसऱ्यांदा तिकीट मिळाले असते तर ते राज्यमंत्री, तर तिसऱ्यांदा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री झाले असते. मात्र भुतडांच्या हट्टामुळे नजरधने यांचे तिकीट कापण्यात आले.
त्यानंतर ससाणे यांना आमदारकीची संधी देण्यात आली, मात्र तिसऱ्यांदाही अनुभवी नेत्यांना डावलून ‘आपल्या हाताखाली काम करणारा’ उमेदवार हवा या भूमिकेतूनच निर्णय झाले. जनतेच्या सहकार्याने भाजप जिंकत राहिली, पण विकास मात्र झाला नाही, असा आरोप आहे.
नगरपालिका निवडणुकीत हा रोष उघडपणे दिसून आला. मतदारसंघात सुमारे ३५ हजार मतदार असताना नगरपालिका निवडणुकीत २५,७६३ मतदान झाले. त्यात नितीन भुतडा समर्थित उमेदवाराला केवळ १०,११९ मते मिळाली, तर तेजस्वी संतोष जैन यांनी कोणतेही पक्षाचे तिकीट न घेता ‘बस’ निशाणीवर ११,१०३ मते घेऊन विजय मिळवला. यामुळे भुतडांची खरी ताकद जनतेसमोर उघडी पडल्याची चर्चा आहे.
राज सिंहासनावर बसून पाच आमदार सोबत असतानाही नगराध्यक्षपद गमावावे लागणे, हीच जनतेने दिलेली थेट चपराक असल्याचे बोलले जात आहे. घरचे उमेदवार पुढे रेटल्यामुळे उमरखेड–महागावचा विकास खुंटला, असा ठपका ठेवला जात आहे.
अनुभवी नेते उत्तमराव इंगळे, प्रकाश पाटील ,राजीव नजरधने, खडसेयांचा सल्ला व एसी समाजाला तिकीट न दिल्यामुळे व माजी आमदाराचा सल्ला न घेता निर्णय घेतल्याने ही परिस्थिती ओढवल्याचेही मत मतदारसंघात व्यक्त होत आहे. माजी आमदारांच्या सहकार्याविना लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये एकही सीट येणार नाही, हे या निवडणुकीतून स्पष्ट झाल्याचे जनतेचे म्हणणे आहे.
याआधीच काही उंबरखेड वार्ता, दैनिक महासागर प्रतिनिधींनी नितीन भुतडांची सीट पडणार असा अंदाज वर्तवला होता. ‘किंगमेकर’ मानले जाणारे माजी आमदार या निवडणुकीपासून दूर राहिल्यानेच भुतडांवर ही वेळ आल्याचे बोलले जात आहे.
आता तरी भाजपने अहंकार बाजूला ठेवून अनुभवी नेत्यांना महत्त्व द्यावे, अशी स्पष्ट मागणी उमरखेड–महागाव मतदारसंघातून पुढे येत आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका माझी आमदाराच्या उत्तमराव इंगळे ,राजीव नजरधने ,प्रकाश पाटील, ससाने ,व खडसे सल्ल्याशिवाय एकही शीट येणार नाही हे विधान सत्य आहे हे भारतीय जनता पार्टीने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.



