Uncategorized

*कार्यकर्त्यांच्याच फितुरीने कांबळेंचा पराभव; उमरखेड–महागाव मतदारसंघात ‘भ्रष्टाचारमुक्त आमदार’ची जनतेची मागणी


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
काँग्रेस प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांचा पराभव कार्यकर्त्यांच्याच अंतर्गत गटबाजीमुळे झाला, अशी उघड चर्चा उमरखेड–महागाव मतदारसंघात सुरू आहे. मात्र पराभव असूनही कांबळे यांनी हिवाळी अधिवेशनात गटनेत्यांकडे मतदारसंघातील विविध समस्या मांडून निवेदने शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी पाठपुरावा केला आहे.
हिवाळी अधिवेशनात काही प्रश्न मांडले गेले असले तरी अधिवेशन संपल्याने उर्वरित प्रश्न पुढील अधिवेशनात घेतले जातील, असे संकेत मिळत आहेत.
उमरखेड मतदारसंघात सलग तीन टर्म भाजपचे वेगवेगळे आमदार निवडून आले; मात्र जनतेच्या मूलभूत समस्या अद्याप प्रलंबितच असल्याचा आरोप होत आहे. पूल, रस्ते व विविध विकास योजनांमध्ये टक्केवारीच्या नादात निकृष्ट दर्जाची कामे झाली असून, आमदार निधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
महागाव नगरपंचायतीतील सुमारे दोन कोटींच्या रस्ते कामातील भ्रष्टाचार हा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या संगनमताने झाल्याचीही चर्चा रंगली आहे.
या पार्श्वभूमीवर संपूर्ण मतदारसंघात “भ्रष्टाचारमुक्त आमदार हवा” अशी तीव्र जनभावना तयार झाली असून, येणाऱ्या निवडणुकीत नवीन चेहरा उमरखेड–महागाव मतदारसंघात पाहायला मिळेल, असे चित्र सध्या दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button