शहर

.उमरखेड नगराध्यक्षपदाचा फैसला उद्या ५ महिला उमेदवारांसह १२७ नगरसेवकांचे निकाल रविवारी


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
उमरखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह १२७ नगरसेवकांचे निकाल रविवारी जाहीर होणार असून, सर्वच राजकीय पक्षांच्या चिंतन बैठकांना वेग आला आहे. या निवडणुकीत ५ महिला उमेदवार नगराध्यक्षपदाच्या रिंगणात होत्या.
मतदार यादीत ४०,६७० मतदार असताना प्रत्यक्षात २७,०५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शहरातील १३ प्रभागांतील ४२ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले.
रविवारी नगरपरिषद सभागृहात मतमोजणी होणार असून, निकालाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. कमी मतदानाचा फटका कुणाला बसणार? यावर चौकाचौकात चर्चा रंगली आहे.
नगराध्यक्षपदाची लढत एसटी बस विरुद्ध कमळ अशी थेट झाल्याची चर्चा असून, नेमका कोण नगराध्यक्ष होणार हे मात्र अखेरपर्यंत गुलदस्त्यातच राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button