शहर

महागाव पोलिसांची धडाकेबाज मोहीम! BNS 285 अंतर्गत 30 वाहनचालकांवर कारवाई**

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

महागाव–उमरखेड मार्गावर तीन वर्षांनंतर पोलिसांनी मोठी वाहतूक मोहीम राबवली. विशेष नाकाबंदी करून करण्यात आलेल्या तपासणीत BNS 285 अंतर्गत 30 वाहनचालकांवर कारवाई झाली.

काय आढळले?
बिना कागदपत्रांची वाहने
फिटनेस नसलेली आणि अवजड वाहने
हेल्मेट–सीटबेल्टचा अभाव
ओव्हरलोडिंग आणि वेगमर्यादा उल्लंघन
काही वाहनांचे प्रलंबित दंड तात्काळ वसूल करण्यात आले.

मोहीम का?महागाव परिसरात:
बिगर कागदपत्र मोटरसायकली
अवैध ऑटो
लहान मुलांकडून बेदरकार वाहनचालक
यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते.
पोलिसांचा इशारा

“नियमभंग करणाऱ्यांवर पुढील काळात आणखी कठोर कारवाई होईल. सुरक्षिततेसाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे.” असे आवाहन ठाणेदार धनराज निळे यांचे सहकारी कायदे साहेब राठोड साहेब व इतर कर्मचाऱ्यांनी केले
नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले असून ती नियमित सुरू ठेवावी, अशी मागणी जोर धरत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button