कामगार ठार : सुरक्षेवर प्रश्नचिन्ह वसंत साखर कारखान्यातील घटना : व्यवस्थापनाबाबत कामगारांत रोष

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड तालुक्यातील वसंत सहकारी साखर कारखाना (सध्या भाडेतत्त्वावर – भैरवनाथ शुगर वर्क्स पोफधारदार) येथे आज (11 डिसेंबर 2025) सकाळी घडलेल्या भीषण अपघातात शेख इरफान शेख उमदू (वय 34, महात्मा फुले वार्ड उमरखेड) या मजुराचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शेख इरफान हे कारखान्यात लेबर कामगार म्हणून कार्यरत होते. सकाळच्या सुमारास ते नियमित कामकाजासाठी बगॅस सेक्शनमध्ये गेले असताना त्यांचा तोल जाऊन ते थेट चैन कॅरिअरमध्ये पडले. यंत्रणा सुरू असल्याने कॅरिअरमधील लोखंडी रॉड थेट त्यांच्या उजव्या छातीमध्ये घुसला. अपघात अत्यंत वेगाने झाल्याने सहकाऱ्यांना त्यांना बाहेर काढण्यासाठी काही क्षणही मिळाले नाहीत.सहकर्मी व अधिकाऱ्यांनी तत्काळ
त्यांना
परिसरात हळहळ – कुटुंब उघड्यावर
शेख इरफान हे कुटुंबाचा आधारस्तंभ होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मित्रपरिवार, ग्रामस्थ, नातेवाईक यांच्यातून हळहळ व्यक्त होत आहे.
या भीषण घटनेनंतर कामगार संघटनांकडून उच्चस्तरीय चौकशी करून कुटुंबाला योग्य नुकसानभरपाई व कारखान्यात कायमस्वरूपी सुरक्षा अधिकारी नेमणूक दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहेत.
कामगार कायद्याची पायमल्ली
कारखान्यात मजुरांना कामावर घेताना कामगार कायद्याची अक्षरशः पायमल्ली केल्या जात असल्याची माहिती कामगारांनी दिली, कायद्यानुसार ८ तास काम करून घेणे नियमात असताना मजुराकडून १२-१२ तास काम करून घेतल्या जात आहे, १२ तास काम करूनही काही कामगारांना ओव्हरटाईम दिल्या जातो त्याचाच दुष्परीनाम म्हणजे आजची घटना होय अशी माहिती मजुराकडून मिळाली त्यामुळे कारखाना व्यस्थापनावर काय कारवाई होते हे बघणे औत्सुकतेचे ठरेल,



