Uncategorized

महागाव नगरपंचायतीच्या घनकचरा गाड्यांचा खासगी जागेत बंदोबस्त

दोन नगरसेवकांच्या मालमत्तेत लाखो रुपयांच्या गाड्या; शहरातील कचरा व्यवस्थापन ढवळून निघाले — तक्रारकर्ते पप्पू कावळे

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

महागाव : शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा बोजा आता प्रत्यक्षात नागरिकांच्या डोक्यावर पडू लागला असताना, महागाव नगरपंचायतीने लाखो रुपयांच्या खर्चातून आणलेल्या घनकचरा घंटागाड्या दोन नगरसेवकांच्या खासगी जागेत उभ्या ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. तक्रारकर्ते पप्पू कावळे यांनी या प्रकारामुळे शहराचे आरोग्य धोक्यात आल्याचे सांगत नगरपंचायत प्रशासनावर थेट निष्क्रियतेचा ठपका ठेवला आहे.

शहर कचऱ्याने भरले, प्रशासन शांत — नागरिक त्रस्त

शहरातील अनेक भागात कचरा न उचलल्याने अस्वच्छता वाढत आहे. रस्ते, नाल्या, सार्वजनिक ठिकाणे कचर्‍याने भरल्याने दुर्गंधी पसरत आहे. माशा, डास, स्ट्रे डॉग्स वाढत असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम दिसत आहेत.

महागावचे आरोग्य कचर्‍यासोबत विल्हेवाटीला

नगरपंचायतीने लाखो रुपयांत आणलेल्या घंटागाड्या शहरात फिराव्यात अशी अपेक्षा असताना त्या नगरसेवकांच्या खासगी मालमत्तेत पडून असल्याचा आरोप नागरिकांत संताप निर्माण करतो आहे. या गाड्या सेवा देण्याऐवजी खासगी जागेत ठेवून जीर्ण अवस्थेकडे जात असून सार्वजनिक संपत्तीचा अपव्यय होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

माजी आमदारांनी दिलेली 30–35 लाखांची रुग्णवाहिका ‘मृत’

तक्रारकर्त्यांच्या मते, माजी आमदार ससाणे साहेबांनी शहरासाठी जीव वाचवणारी सेवा म्हणून दिलेली 30–35 लाखांची रुग्णवाहिका सध्या PWD च्या आवारात मृत पडली आहे. याच धर्तीवर घनकचरा गाड्यांचीही अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असल्याचे सांगितले जात आहे.

“गाडीवाला आया… पण कचरा उचलायला नव्हे” — कावळे

शहरातील नागरिकांचे म्हणणे,
“गाडीवाला आया है कचरा निकाल” ही घोषणा आता केवळ आठवणीत उरली आहे. भ्रष्टाचार आणि निष्क्रियतेने ही सेवा पूर्णपणे रुळावरून घसरली आहे.”

नागरिकांची चौकशीची मागणी

सार्वजनिक संपत्ती खासगी जाग

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button