शहर

सर्वसामान्य नागरीकांवर लाठीचार्ज करून लोकशाहीचा गळा घोटलात्यांच्यावर कारवाई करा : (शिंदे) शिवसेनेचे एसडीओंना निवेदन, आंदोलनाचा इशारा

शेख मुजाहिद सह-संस्थापक मो.7798306192

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील लीज संपष्टात आलेला अतिक्रमणकारक पेट्रोल पंप तात्काळ हटविण्याची मागणी करून, सच्चा शिवभक्तांनी मागील अनेक दिवसांपासून कायदेशीर आणि लोकशाही मागनि आंदोलन सुरू ठेवले होते.

परंतु दुदैवाने, उमरखेड प्रशासनाने त्यांच्या न्याय्य मागणीचा विचार न करता हुकूमशाही पद्धतीने व अधिकाराचा गैरवापर करुन पोलीस प्रशासनास हाताशी धरुन कार्यवाही केली आहे. हा प्रकार लोकशाहीला काळिमा फासणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पेट्रोल पंपासारख्या ज्वलनशील पदार्थाच्या विक्री व साठ्वणकीमुळे भविष्यात महाराजांच्या पवित्र पुतळ्यास धोका निर्माण होऊ शकतो, हे वास्तव प्रशासनाला समजत नाही का? सदर पेट्रोल पंपामळे आज महाराजांचा पुतळा नागरिकांच्या नजरेपासून झाकला जात आहे, ही प्रत्येक शिवभक्ताच्च्या मनाला वेदना देणारी बाब आहे. तरीही प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या गंभीर मुद्दयाकडे कानाडोळा करून एकनिष्ठ शिवभक्तावर कारवाई करणे हे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे आहे.

शिवसेना (शिंदे गट) उमरखेड यांच्या वतीने या हुकूमशाही व अन्याय्य कार्यवाहीचा तीव्र निषेध करीत असून, प्रशासनाने तात्काळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पतळा सरक्षित आणि सुस्पष्ट दिसेल अशा स्थितीत आणावा, तसेच संबंधित पेट्रोल पंप हटविण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पाठविलेल्या निवेदनात नमुद करून हुकुमशाही पद्धतीने शिवप्रेमीवर व सर्वसामान्य नागरीकांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच प्रशासकीय अधिकारी यांचे तात्काळ स्थलांतर करुन योग्य ती कारवाई करावी अन्यथा तिव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा शिवसेना शिंदे पक्षाचे शहराध्यक्ष एड संजीव कुमार जाधव, माजी शहर प्रमुख अतुल मैड, एड अजय पाईकराव दामोदर इंगोले, सपना चौधरी, यांच्यासह शिवसैनिकांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button