Uncategorized

महागाव एपीएमसीत खरेदी ठप्प; व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट — अधिकारी मौन

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे

महागाव तालुक्यात सोयाबीन व कापूस खरेदी-विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे (एपीएमसी) ८० अडतदारांचे लायसन्स असतानाही खरेदी पूर्णपणे ठप्प असून व्यापारी मनमानी पद्धतीने शेतमालाची खरेदी करीत आहेत. नियमाने याडमध्ये खरेदी होणे आवश्यक असताना व्यापार्‍यांनी बाजार समितीला डावलून दुकानेच थेट खरेदी केंद्रे बनवली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची उघड आर्थिक लूट होत असून सहकार विभाग याकडे डोळेझाक करीत असल्याची टीका होत आहे.

फुलसांगी येथील उपबाजार समितीतही खरेदी सुरु नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. हमीभावाने खरेदी न करता ,व्यापारी कवडीमोल भावाने ३५०० ते ४२०० रुपये दराने सोयाबीन खरेदी करून पक्के बिल देत नाहीत. पक्के बिल नसल्याने शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. एकीकडे हवामानाच्या संकटामुळे त्रस्त शेतकरी तर दुसरीकडे व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे आर्थिक चक्रावणूक — अशा दुहेरी परिस्थितीत शेतकरी पूर्णपणे असहाय्य झाले आहेत.

हिवरा, फुलसांगी, मुडाणा, काळी, दौलतखान परिसरात कच्च्या बिलांवर करोडो रुपयांची उलाढाल होत असून ना बाजार समिती, ना इन्कम टॅक्स विभाग, ना सेल्स टॅक्स विभाग — कोणताही अधिकारी या व्यापारावर लक्ष देत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांची व्यापाऱ्यांशी संगनमत असल्याचा संशय शेतकऱ्यांत बळावत आहे.

दरम्यान, एपीएमसी सभापती भारतीय जनता पक्षाचे असूनही बाजार समितीची आर्थिक स्थिती ढासळलेली आहे. अडतीतून लाखोंची वसुली झाली असतानाही कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. असे सचिवांनी सांगितले आहे.ठेवींचे नियोजन न केल्याने व मागील काळात अनाडी खर्चामुळे व चुकीच्या धोरणामुळे ही वेळ आली असून प्रशासनाचा कारभार प्रश्नचिन्हांखाली आला आहे.

शेतकऱ्यांना योग्य व हमी भाव मिळावा, पक्की बिले देण्यात यावीत आणि याडमध्येच मालाची अधिकृत नोंद व खरेदी व्हावी, या मागण्या शेतकरी सातत्याने करत आहेत. मात्र जिल्हा निबंधक व सहकार अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

शेतकऱ्यांची मागणी एकच —
“खरेदी अधिकृत याडमध्ये करा, हमीभावाने खरेदी करा,पक्की बिले द्या; अन्यथा मोठा संघर्ष उभा राहील.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button