शहर

महागाव पोलिसांची १२ तासांत धडक कारवाई; जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी ३ आरोपी अटकेत


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील चिलगव्हाण येथे एका इसमावर जीवघेणा हल्ला झाल्याप्रकरणी महागाव पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून अवघ्या १२ तासांत ३ आरोपींना अटक केली.
फिर्यादी शीतल राहुल खंडारे (वय २२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दोन वर्षांपूर्वीच्या गणेश विसर्जनावेळी झालेल्या वादाच्या रागातून आरोपी अनय बबनराव सुपळे, अक्षय आत्माराम राठोड, वैभव पंडित राठोड व किशोर पंडित राठोड हे फिर्यादीच्या पतीवर राग धरून होते.
दि. ६ जुलै २०२६ रोजी रात्री आरोपी वैभव राठोड याने फिर्यादीच्या घरी येऊन तिचे पती राहुल खंडारे यांना बोलावून नेले. त्यानंतर गावात आरडाओरडा सुरू झाल्याने फिर्यादी व नातेवाईक घटनास्थळी गेले असता राहुल खंडारे यांना आरोपींनी धारदार शस्त्राने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचे आढळले. त्यांच्या डोक्यावर, पाठीवर, खांद्यावर व कानावर जखमा झाल्या असून त्यांच्यावर पुसद व यवतमाळ येथे उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी महागाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) मधील विविध कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ४ स्वतंत्र पथके तयार करून शोधमोहीम राबविण्यात आली आणि ३ आरोपींना १२ तासांच्या आत अटक करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button