Uncategorized

हिंगोली विधानसभेच्या प्रभारीपदी साहेबराव कांबळे!

शेख मुजाहिद ससंपादक मो7798306192

उमरखेड :प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस साहेबराव कांबळे यांची हिंगोली विधानसभेच्या प्रभारीपदी वर्णी लागली आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवत ही जबाबदारी सोपवली असून पक्ष संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांना एकत्र आणणे आणि आगामी निवडणुकांसाठी रणनिती आखणे अशी महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.

प्रशासकिय अधिकारी म्हणून प्रदिर्घ अनुभव असलेल्या साहेबरावांनी आपली राजकीय कारकीर्द उमरखेड विधानसभे पासुन सुरूवात केली. अल्पावधीतच लोकप्रिय ठरल्याने त्यांना स्थानिक व राज्यस्थरावर पसंती मिळून विधानसभेची उमेदवारी ही मिळाली होती. एव्हढ्यातच कॉग्रेसकडून त्यांना प्रदेशवर स्थान देत सरचिटनीस पदी ही घेण्यात आले होते. काम करण्याचा आवाका पाहून व माणसे जोडण्याची पद्धत, ह्यामळे परत एकदा विश्वास दाखवित पक्षाने त्यांना हिंगोली विधानसभेच्या प्रभारी पदि त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कांबळे आता, काँग्रेस पक्षाच्या हिताचे काम प्राधान्याने राबवून मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचविण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे उमरखेडसह, हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात पक्ष संघटनेला याचा मोठा फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. काँबळेंच्या नियुक्तीमुळे पक्षाची ताकद अधिक बळकट होणार, असा कार्यकर्त्यांचा विश्वास!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button