हैदराबाद गॅझेट लागू करुन बंजारा समाजाला एस.टी आरक्षण द्या!

- गोरसेना यांची मागणी
महागांव, प्रतिनिधी संजय नागरगोजे
निजाम प्रांतातील १९०१ ते १९४८ पर्यंत हैदराबाद गॅझेटमध्ये गोरबंजारा, लंबाडा,लमाण जातीची नोंद जमात अशी असून त्या नुसार तेलंगणा आंध्र प्रदेशातील बंजारा,लंबाडा जातींना अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळालेले आहे. मात्र १९४८ नंतर राज्याच्या पुनर्रचने दरम्यान मराठवाड्यासह विदर्भ खान्देशचा भाग महाराष्ट्राला जोडल्या मुळे मुळचे असलेले अनुसुचित जमातीचे आरक्षण संपुष्टात येऊन विमुक्त जातीच्या संवर्गात रुपांतरित करण्यात आले.त्यामुळे महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजावर एस. टी. आरक्षणा बाबत घोर अन्याय झाला आहे. त्यामुळे बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावे यासाठी महागाव शहरातून 10 सप्टेंबर रोजी मोर्चा काढून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तहसील प्रशासनामार्फत निवेदन सादर करण्यात आले.
गेल्या काही दिवसांत मराठा कुणबी एकच असल्याचे समजून हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देणार असल्याचे फडणवीस सरकारने जि. आर. काढून जाहीर केले आहे. त्याला अनुसरुन महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करुन अनुसूचीत जमातीचे एस. टी. चे आरक्षण देण्याची मागणी गोर महागाव तालुका व तालुक्यातील सर्व समाजबांधवा मार्फत निवेदना द्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात आज १० सप्टेंबर रोजी की,महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाजवळ १९५० अगोदर अनुसुचित जमातीचे दुर्मिळ पुरावे असून क्रिमीनल ट्राईब कायद्याने बाधीत असूनही सेंट्रल प्रोवीन्स व बेरार प्रांतामध्ये तसेच हैदराबाद गॅझेट मध्ये त्यांना अनुसुचित जमातीच्या यादीत स्थान दिलेले होते.मात्र भाषावार प्रांतरचना, राज्य पुनर्चना कायद्याचा फटका महाराष्ट्रातील गोरबंजारा लमाण लंबाडी यांना बसला असून मुळ आरक्षणाला मुकावे लागले आहे .यासाठी गोरबंजारा समाजाने सातत्याने संघर्ष पुकारला असून त्यांना न्याय देण्यासाठी बापट आयोग,इधाते आयोग,भाटीया आयोग डिएनटी एस टी आयोगाने महाराष्ट्रातील गोरबंजारा हा अनुसुचित जमातीचे आरक्षणाबाबत सकारात्मक शिफारशी करुनही त्यांना ते आरक्षण देण्यात आलेले नाही. .डोंगर दर्यात राहणारा समाज आजही आदीम समुदायाची सर्व पात्रता पूर्ण करतो कारण स्वतंत्र बोली,भाषा,पेहराव,धाटीपरपंरा, स्वतंत्र तांडावस्ती,खानपान,स्वतंत्र असूनही त्यांना एस टी आरक्षणा पासून जाणीवपूर्वक टाळले जात आहे. अनुसूचित जमातीचे आरक्षणाबाबत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, राष्ट्रसंत रामराव महाराज सह अन्य समाजसुधारकांनी सातत्याने प्रयत्न केले असून -गोरसेना या बंजारा समाजातील अग्रगण्य संघटनेने गेल्या विस वर्षापासून मोर्चा आंदोलने केलेली आहेत. मराठा कुणबी समाजासाठी हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण लागू होते त्या धर्तीवर गोरबंजारा समाजासाठी सुद्धा तेच गॅझेट लागू करुन एस टी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे अशी मागणी गोर सेना महागाव व तालुक्यातील सकल बंजारा समाजामार्फत निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महागाव तहसील प्रशासना मार्फत निवेदन सादर केले, या वेळी निवेदन देतांना बंजारा शक्ती सेनेचे मार्गदर्शक किसान राठोड, महंत अभिमान महाराज , सुनील राठोड, कॉ. डी. बी. नाईक, अमोल राठोड, स्वप्निल राठोड, गणेश राठोड, अंकुश आडे, जाधव सर, एडवोकेट रवींद्र जाधव, दिनेश जाधव, अरविंद राठोड, ओमकार चव्हाण, सुनील चव्हाण, सुशील राठोड यांचे बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.



