Uncategorized

आमदार किसन वानखडे यांच्या हस्ते रू 11,11,111 मुख्यमंत्री सहायता निधी येथे जमा!

  • महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
  • उमरखेड महागाव मतदार संघामध्ये नितीन भुतडा यांनी उंबरखेड येथे दहीहंडी च्या कार्यक्रमासाठी ठेकेदार अधिकारी कर्मचारी यांच्याकडून लाखो रुपये जमा केले होते . त्या अनुषंगाने दहीहंडीच्या दिवशी नाच गाण्याचा प्रोग्राम ठेवण्यात आला होता. त्याचा मोठा वाजा गाजा करत पोम्प्लेट काढून मोठी प्रसिद्धी केली होती त्याचा परिणाम जनतेमध्ये दिसून आला बरेच सामाजिक कार्यकर्ते व सर्व सामान्य माणसांमध्ये वर्गणी करून उधळपट्टी करणाऱ्या कार्यकर्त्यावर जनता नाराज झाली होती. त्याबाबत पोर्टल द्वारे बातम्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या त्यावेळेस त्या होणाऱ्या कार्यक्रमाला म्हणजे नाच गाण्याच्या कार्यक्रमाला आमदाराने आपले हात वर केले होते .त्या कार्यक्रमाची माझा काही संबंध नाही. अशी प्रतिक्रिया दिली होती .त्याबाबत उमरखेड महागाव मतदार संघात चर्चेला उदाण आले होते उंबरखेड महागाव मतदार संघात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे अतोनात शेत पिकाचे नुकसान झाले असताना नाच गाण्याचा कार्यक्रम घेणे उचित होत नाही म्हणून जमा झालेल्या वर्गणीतून काही ठराविक रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला जमा करून प्रसिद्धी मिळावी या हेतूने पत्रकार परिषदेत घेऊन त्यामध्ये ही घोषणा केली 11,11,111 रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये चेक जमा केले परंतु उरलेली रक्कम त्यांचा हिशोब आमदार किंवा नितीन भाऊ जनतेला देणार आहे का?,अशी चर्चा संपूर्ण मतदारसंघांमध्ये सध्या सुरू आहे .आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मुंबई येथे भारतीय जनता पार्टी यवतमाळ व पुसद जिल्ह्याचे समन्वयक माननीय श्री नितीनभाऊ भुतडा यांनी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी ₹11,11,111 देणगीचा धनादेश सुपूर्द केला.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले! यावेळी जिल्ह्याचे नेते माजी मंत्री श्री मदनभाऊ येरावार,उमरखेड-महागाव विधानसभेचे आमदार श्री किसनरावजी वानखेडे,माजी आमदार श्री विजयराव खडसे,मा.जि.प.अध्यक्ष रमेश चव्हाण उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button