शहर

महागाव नगरपंचायतीत सत्तांतर; प्रभाग क्रमांक एकचा रस्ता मार्गी लागणार का? भाजपच्या रंजना आडे नगराध्यक्ष; नागरिकांचे लक्ष प्रलंबित कामाकडे


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायत मधील राजकीय घडामोडींना वेग आला असून सत्तांतरानंतर प्रभाग क्रमांक एकमधील प्रलंबित रस्त्याच्या कामाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
नामदेव ससाने हे आमदार असताना त्यांनी प्रभाग क्रमांक एकमधील रस्त्याचे उद्घाटन करून त्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. त्याच प्रभागातून Bharatiya Janata Party च्या रंजना आडे या निवडून आल्या होत्या. मात्र अतिक्रमण न काढल्यामुळे रस्त्याचे काम रखडले. संबंधित निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला होता, परंतु प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही.
दरम्यान, नगरपंचायतीतील राजकीय घडामोडींनंतर काँग्रेस नगराध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव पारित झाला. त्यानंतर २७ फेब्रुवारी २०१९ रोजी रंजना आडे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. या निवडणुकीत भाजपला उबाटा गट, शिंदे गट तसेच काँग्रेसच्या तीन नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला. एकूण मतदानात काँग्रेस गटाला ५ मते, तर भाजप गटाला १२ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी मुळे साहेब यांनी दुपारी २ वाजता ही प्रक्रिया पूर्ण केली.
भाजपच्या नगराध्यक्षांची निवड झाल्यानंतर प्रभाग क्रमांक एकमधील रस्ता कामाला आता गती मिळणार का, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. अतिक्रमणाची अडचण दूर करून तातडीने रस्त्याचे काम सुरू करावे व रहदारीसाठी मार्ग खुला करावा, अशी मागणी वार्डातील व परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button