Uncategorized

उमरखेडमध्ये लेआउट धारकाचा सुळसुळाट अनाधिकृत ले-आउट धारकावर प्रशासन मेहरबान

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड : तालुक्यातील ढाणकी शहरात विविधजागी अनाधिकृत लेआउटच्या संदर्भात ग्राहकांच्या तक्रारी येत असून लेआउट मध्ये नगरपंचायत ने विविध परवानग्या न देता काही गुंठेवारी वर लेआउट तयार करून प्रचंड प्रमाणात माया गोळा करण्याचा गोरखधंदा ढानकी येथे सुरू असून उपजिल्हाधिकारी यांच्या आदेश तसेच तहसीलदार यांच्या परवानगी तसेच ओपन स्पेस न सोडणे टाऊन प्लॅनिंग, कम्युनिटी दहा टक्के अशा विविध प्रकारच्या सोयी सुविधा न देता गुंठेवारीवर अनधिकृत लेआऊटची विक्री करण्याचा गोरख धंदा ढाणकी शहरांमध्ये विविध लेआऊट धारकाकडून होत आहेत या गोष्टीकडे संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरत असल्यामुळे अनाधिकृत लेआउट धारकाचा सुळसुळाट कधी थांबेल हा चिंतेचा विषय चर्चेला येत आहे यवतमाळ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले ढाणकी हे कालांतराने तालुका होण्याचे संकेत असल्यामुळे विशिष्ट प्रकारच्या बिल्डर लॉबीने संधीचे सोने करण्यासाठी आणखी शहरातल्या काही शासकीय जागा सुद्धा हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत या सर्व गुंठेवारीची लेआउट ची विक्री बंद करण्यात यावी अशा प्रकारची काही सामाजिक संघटनेने व राजकीय संघटनेने तक्रारी करून सुद्धा संबंधित विभाग लेआउट धारकावर मेहरबान असल्याची चर्चा जोर धरत असून बिल्डर लॉबी आपल्या फायद्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसून शासन व प्रशासनाला चुना लावण्याचे काम करत आहेत ढाणकी उमरखेड रोडवर मोहन नगर, दत्तनगर याठिकाणी तर बिटरगांव जेवली रोडवर तसेच टेर्भुरधरा रोड सह इतर ठिकाणी अनाधिकृत लेआउट सुरू आहेत. या सर्व बाबीचा संबंधित विभागाने विचार करून चौकशी करून अनधिकृत लेआउट धारकावर कारवाई करून सामान्य शेतकरी, कष्टकरी लोकांना न्याय द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!