संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
आज दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी संत सेवालाल महाराज यांची जयंती गावात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यावेळी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास डॉ. पंजाब राठोड, आत्माराम राठोड, डॉ. गजानन जाधव, राठोड सर, चव्हाण सर, माजी नगरसेवक राठोड तसेच बंजारा समाजाचे कार्यकर्ते व गावातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. पंजाब राठोड, आत्माराम राठोड आणि डॉ. गजानन जाधव यांच्या पुढाकारातून अनेक वर्षांपूर्वी संत सेवालाल महाराजांचे थैलचित्र स्थापित करण्यात आले असून, दरवर्षी त्या ठिकाणी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे दरवर्षी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती पाहायला मिळते.
या यशस्वी आयोजनाचे सर्व श्रेय डॉ. राठोड, डॉ. जाधव आणि आत्माराम राठोड यांना जाते. त्यांच्या प्रयत्नांमुळे समाजात एकात्मता आणि भक्तीभाव अधिक दृढ होत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.



