Uncategorized

महागांव येथे शासकिय आदिवासी इंग्रजी आश्रम शाळा होणार!

“आदिवासी राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांचा पुढाकार”

महागांव, संजय नागरगोजे

महाराष्ट्र राज्यातील डोंगराळ व अतिदुर्गम भागातील आदिवासीमंधे शिक्षणाचा प्रसार व्हावा या हेतूने शासनाने सन 1972-73 पासून आश्रम शाळा योजना सुरु केली या योजनेतर्गत सध्या शासनामार्फत चालविल्या जाणाऱ्या 497 शाळा सुरु आहेत परंतु अमरावती विभागाअतर्गत पुसद आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शासकीय आश्रम शाळा, बोरिवन ता. उमरखेड जि यवतमाळ हि आश्रम शाळा अपूर्ण विध्यार्थी संख्यमुळे बंद करण्यात आली होती मात्र आस्थापना कार्यरत आहे आदिवासी मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने महागाव येथे सुरु करण्याचा निर्णय हा शासनाने घेतला आहे सदर शाळा हि इंग्रजी माध्यमातून सुरु होणार पुसद प्रकल्पामध्ये महागांव असा एकमेव आदिवासी बहुल तालुका आहे जिथे आदिवासी वसतिगृह , आश्रमशाळा नव्हती पण आता मात्र शाळा होणार यासाठी शासनाने हिरवी झेंडी दिली आहे यासाठी मा.आदिवासी राज्यमंत्री इंद्रनील नाईक,आदिवासी विकास विभाग पुसद, विविध आदिवासी सामाजिक संघटना,आदिवासी सामाजिक कर्यकर्ते यांचा मोठा वाटा आहे. आता बहूप्रतीक्षेनंतर आता महागाव आदिवासी बांधवांकडून राज्यंत्री इंद्रनील नाईक व विविध समाजिक संघटनांचे पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन केल्या जात आह.

( चौकट)

महागांव तालुक्यातील बहुतांश माझे आदिवासी विध्यार्थी हे शिक्षणापासून वंचित होते. आता त्यांना आपल्याच महागांव तालुक्यात शिक्षण घेण्यास इंग्रजी माध्यमाची आश्रम शाळा होणार आहे . विधार्थी हा समाजाचा केंद्रबिंदू असून आदिवासी समाजाचे उज्वल भविष्य आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button