शहर

जेवणात खडे-कीडा; तक्रार केल्यावर अरेरावी? महागाव रोडवरील ‘तुलसी टी पॉईंट’मध्ये प्रकार; पोलीस वसाहतीतील रहिवाशाची तक्रार

मुख्य संपादक
उमरखेड :- – शहरातील महागाव रोडवरील नव्याने सुरू झालेल्या ‘तुलसी टी पॉईंट’ हॉटेलमध्ये सहकुटुंब जेवणासाठी गेलेल्या कुटुंबाच्या जेवणात खडे व कीडा आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तक्रार केल्यानंतर हॉटेल चालकाने अरेरावीची भाषा वापरून धमकी दिल्याचा आरोप पोलीस वसाहतीतील रहिवासी निलेश रंगराव राऊत (वय ४१) यांनी केला आहे. याबाबत उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, दि. ११ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ८.३० ते ९.३० वाजेदरम्यान राऊत हे कुटुंबासह उमरखेड-नांदेड बायपास मार्गावरील संबंधित हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवणादरम्यान त्यांच्या सोबत असलेल्या चंद्रे नामक महिलेच्या ताटात खडा, तर राऊत यांच्या ७ वर्षीय मुलाच्या जेवणात कीडा आढळल्याने कुटुंब हादरले.
हा प्रकार हॉटेल व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर समाधानकारक उत्तर देण्याऐवजी अरेरावीची भाषा व धमकी दिल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. या घटनेमुळे कुटुंबाला जेवण अर्धवट सोडून बिल चुकते करून बाहेर पडावे लागल्याचे तक्रारीत नमूद आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून, संबंधित हॉटेलमधील अन्नसुरक्षा व स्वच्छतेबाबतही तपास केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button