Uncategorized

वाकान येथे वादळी वाऱ्यासह आवकाळी पावसाने झोडपून काढलेअनेकांच्या घरावरील टिन पत्रे उडाली,

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात वाकान कोदंरी परिसरात आज ९ जुन रोजी सोमवारी दीवसभर येथील नागरिकांना तप्त उन्हाचे चटके सोसावे लागले.व सायंकाळी ठीक ५.०० वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाले.आणी वादळी वाऱ्यासह आभाळ दाटून आले आणि काही क्षणातच विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.त्यामुळे गावातील नागरिकांच्या घरावरील टिन पत्रे उडून गेली व चांगलीच तळाबंळ उडाली दसरत लिंबा पवार यांच्या घरावर वृक्ष उन्मळून पडल्याने घरावरील टिन पत्रे फुटुन गेली असुन त्यांचे नुकसान झाले आहे.तरी संबंधित अधिकाऱ्यांनी घराचे नुकसान झालेले पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी सुरेखा दसरत पवार यांनी केली आहे अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.राज्यातील बहुतांश कमाल तापमानात वाढ झाल्याने तप्त उन्हाचे चटके बसत असतांना पुढील चार दिवस राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.हवामान विभागाचा अंदाज खरा ठरत असुन आज सोमवारी ९ जुन रोजी संध्याकाळी अवकाळी पावसाने वाकान परिसराला चांगलेच झोडपून काढले दरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाला असून येथील नागरिकांना रात्रभर अंदाराचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे नागरीकांची चागंलीच दमदाटी झाली असून संबंधित विद्युत पुरवठा अधिकाऱ्यांनी कमीत कमी विद्युत पुरवठा तरी सुरळीत चालू ठेवावा अशी मागणी येथील नागरिकांमधून केली जात आहे.या अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे घरावरील टिन पत्रे उडाली असून नुकसान झाले आहे व वादळी वाऱ्यामुळे दसरत लिंबा पवार यांच्या घरावर वृक्ष उन्मळून पडल्याने त्यांच्या घराचे नुकसान झाले आहे त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!