महाराष्ट्र शासनच्या घरकुलधारकांना पाच ब्रास वाळू मोफत तहसीलदार अभय मस्के घरकुल लाभार्थ्यांना वाळू देतील का?

प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्याला चारी बाजूने नदी वाहते तीन नदीचा संगम हिवरा येथे आहे. मोठे मोठे नाले चारी बाजूने नदीला मिळालेले आहे. त्यामुळे महागाव तालुका रेतीचे माहेरघर असताना शासनाने काढलेले आदेश घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू फुकट त्या आदेशाची अंमलबजावणी जिल्हाधिकारी मीना यांनी केली परंतु तहसीलदार अभय मसके हे घरकुल लाभार्थ्यांना पाच-बास वाळू देण्यास असमर्थ ठरले आहे . महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार दिनांक 20 मे ते 9 जून पर्यंत मोफत वाळू वाटप करण्याचे उद्दिष्ट होते, महागाव तालुक्यातील 350 घरकुल मंजूर असून काही घरकुलाचे बांधकाम सुरू आहे, अवैध रेती वाहतुकीचे मोठे प्रमाण सुरू आहे .परंतु तहसीलदाराचे अकार्यक्षमता असल्यामुळे शासनाची कोणतीही योजना ची अंमलबजावणी महागाव तालुक्यात होत नाही .ही मोठी शोकांतिका आहे. पटवारी मंडल अधिकारी यांना ह्या योजनेची माहिती नाही घरकुल लाभार्थ्यांनी मागणी करूनही वाळू उपलब्ध करून देण्यात आली नाही . घरकुल लाभार्थ्याच्या घरोघरी जाऊन वाळू उपलब्ध करून द्यायचे शासनाचे धोरण कागदोपत्रीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अभय मस्के घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू उपलब्ध करून देणार आहे का? हा प्रश्न घरकुल लाभार्थ्यांना पडला आहे.