उमरखेड नगर परिषदेच्या कार्याकाळात रोड व नाल्या बांधकामात विलंब: माहिती मागवली

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड – उमरखेड नगर परिषदेच्या कार्याकाळात प्रशासनिक कार्याकाळात रोड व नाल्या बांधकाम संदर्भात कोण-कोणत्या भागात वर्क ऑर्डर देण्यात आली आहे आणि अद्याप पर्यंत काम सुरू केले नाही याची सविस्तर माहिती मिळणे बाबत गट नेता प्रशांत उर्फ विजय कृपासागर हरडफकर यांनी मुख्याधिकारी नगर परिषद, उमरखेड यांना पत्र लिहिले आहे.
हरडफकर यांनी पत्रात म्हटले आहे की, उमरखेड नगर परिषद अंतर्गत प्रशासकीय कार्याकाळात रोड व नाल्याचे नवीन बांधकाम संदर्भात वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. परंतु आज पर्यंत काम अर्धवट स्वरुपामध्ये दिसून येत आहे. काम कोणत्या कारणाने थांबविण्यात आले किंवा कोणाकडून सदरील काम थांबविण्यात आले आहे याची सविस्तर माहिती देण्यात यावी.
या पत्राने उमरखेड नगर परिषदेच्या कार्याकाळात रोड व नाल्या बांधकामात विलंब झाल्याचे उघडकीस आले आहे. नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना या बाबत सविस्तर माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.



