Uncategorized

ट्रॉलीत कुजलेला मृतदेह आढळलाकरोडी रोडवरील घटना; तरुणाची आधारकार्डवरून पटली ओळख

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड, दि. १६ : येथील
करोडी रस्त्यावरील मटन मार्केटसमोर उभ्या असलेल्या एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये शुक्रवारी (दि. १६) सकाळी एका पस्तीस वर्षीय युवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सुरेश फुलसिंग जाधव (वय ३५) असे मृताचे नाव असून, तो येथून पाच किलोमीटर अंतरावरील वरुडबिबी गावचा रहिवासी होता.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमरखेड शहराचा आठवडी बाजार बुधवार, १५ मे रोजी भरतो. त्या दिवशी सुरेश शहरात आला होता. त्याचे वडील फुलसिंग जाधव त्याला शोधण्यासाठी आले असता, तो दारूच्या नशेत आढळून आला. वडिलांनी त्याला दारू न पिण्याबाबत समजावून मोटरसायकलवर बसवले होते. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर सुरेशने वडिलांच्या मोटरसायकलवरून उडी मारून पलायन केले होते. तेव्हापासून तो बेपत्ता होता. दरम्यान, करोडी रस्त्यावर साहित्य (ढब्बर) टाकणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉल्या नेहमी उभ्या असतात. आज सकाळी एका ट्रॉली मालकाचा लहान मुलगा खेळण्यासाठी ट्रॉलीवर चढला असता, त्याला हा मृतदेह दिसला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. घटनेची माहिती मिळताच उमरखेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून आधारकार्डच्या आधारे त्याची ओळख पटवली. मृत सुरेशच्या वडिलांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!