Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
Uncategorized

वनरक्षकाला शिवीगाळ, मारहाण; जिवे मारण्याची धमकी
शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील टेंभुरदरा वनक्षेत्रात गस्तीवर असलेल्या वनरक्षकाला शिवीगाळ करून मारहाण तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी १८ सप्टेंबर रोजी पोफाळी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सोमनाथ भागवत कापरे (२६), टेंभुरदरा बीटच्या फिर्यादीवरून वनरक्षक गजानन बद्रुराठोड (५२), रा. टेंभुरदरा, ता. महागाव यांनी तक्रार दिली आहे. वनरक्षक गस्त घालत असताना जंगलात जनावरे चारताना आरोपी आढळून आला. यावेळी कापरे यांनी सागवानाच्या चौकटी व इतर चापटा-बुक्क्यांबाबत विचारणा केली.
दरम्यान, आरोपीने वनरक्षकासोबत हुज्जत घालत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. वनरक्षकाने मोबाईलमध्ये घटनेचे रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने हातातील मोबाईल फेकून दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर कॉलर पकडून धक्काबुक्की व मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला.
तसेच, जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. वनरक्षकाच्या जबानी अहवालावरून पोफाळी पोलिसांनी कलम 132, 196, 351 व 352 अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोफाळी पोलीस करीत आहेत.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button