उमरखेडातील प्राचीन लेंडी नालाच गायब तक्रार देऊनही आतापर्यंत एसडीओ न कोणतीही ठोस कारवाई केली नाही

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798386192
उमरखेड : आंबवन तलावातून निघालेला लेंडी नाला ढाणकी बायपासपर्यंत सुरक्षित आहे. मात्र त्यानंतर हा नाला गायब झाला आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे. या निमित्ताने मात्र महसूल विभागासह एनएच आयने हात वर केल्याने गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
शहरातील ढाणकी रोडवर नागपूर-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम एनएचएआय करीत आहे. वरील बाजूने अंबवन तलावातून निघणारा प्राचिन नाला आहे. येथूनच हा मार्ग जातो. रेकॉर्डनुसार हा लेंडीनाला जवळपास ८० फूट रुंदीचा असून, बारमाही पाणी वाहणारा आहे. या लेंडी नाल्यावर नागापूर ग्रामपंचायतच्या सार्वजनिक विहीरीसह गावंडे कॉलेज व एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन विहिरी आहेत. समोर जाऊन हा लेंडी नाला पैनगंगा नदीला मिळतो. ढाणकी रोडवरील बायपास पुलापर्यंत लेंडीनाला हा सुरक्षित दिसत आहे. मात्र ढाणकी रोड ओलांडताच हा नाला गायब झाला आहे. त्यामुळे वरील भागातून येणाऱ्या पाण्यासह शहरातून ढाणकी रोडच्या काठाने येणारे घाण पाणी मात्र आणखी रोडवरील पुलाजवळ साचले आहे. मागील दोन महिन्यापासून हे पाणी इथे साचत असून साचलेल्या पाण्याने पातळी ओलांडली आहे. सदर दूषित पाणी बाजूच्या तीनही विहिरीमध्ये झिरपत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका वाढला आहे. डायरिया, कॉलरा टायफाईडसारख्या साथीच्या आजाराची भिती बळावली आहे.
८० फुटांचा लेंडी नाला गेला कुठे ?
महसूल दप्तराच्या नोंदीनुसार हा नाला ८० फूट रुंदीचा आहे. महामार्गाच्या कामापूर्वीपासून तो सरकारी रेकॉर्डवर असल्याचे पुरावे आहेत. मात्र, दोन महिन्यात हा नाला कसा गायब झाला, हा प्रश्न आहे. त्यामुळे हरवलेला लेंडीनाला शोधण्याची जबाबदारी आता, स्थानिक महसूल प्रशासनावर आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा नो रिस्पॉन्स
नाला गायब झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पोहोचविल्याची खात्रीलायक माहिती आहे. मात्र, या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कुठलाही रिस्पॉन्स मिळाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनी वरून संपर्क केला असता त्यांनी कॉल रिसीव्ह केला नाही. त्यामुळे आता या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
प्रकरणाची चौकशी सुरू : एसडीओ
संबंधित लेंडी नाला बुजल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. महामार्ग प्राधिकरण व भूमापन विभागाला पत्र देण्यात आली आहेत. त्यामुळे लेंडी नाला कसा गायब झाला, या संबंधाने चौकशी अंति निष्पन्न होईलच, परंतु लेंडी नाला पूर्ववत चालू करणे ही प्राथमिकता असून लवकरच मार्ग काढण्यात येईल, अशी प्रतिक्रिया एसडीओ सखाराम मुळे यांनी दिली.