युवकांनी संघटनेला नवचैतन्य द्यावेअँड पुरुषोत्तम खेडेकर

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड : मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अँड पुरुषोत्तम खेडेकर आज उमरखेड येथे जनसंवाद दौऱ्या निमित्त स्थानिक जिजाऊ भवन येथे जनसंवाद सभेला त्यांनी संबोधित केले . या वेळी संघटनेला नवचैतन्य द्यायचे असेल तर नवयुवकांनी संघटनेमध्ये सक्रिय सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात संघटन वाढवावा लागेल . तसेच शिक्षण सत्ता धर्म सत्ता अर्थ सत्ता प्रचार प्रसार माध्यम सत्ता व राजसत्ता या सत्तेपासून बहुजन समाज दूर असून ह्या सत्ता हस्तगत करण्यासाठी कसोशीने सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे . आज सर्वच क्षेत्रात स्त्रिया पुढे जात असून स्त्रियांनी घराबाहेर पडून कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी विचार पिठावर माजी आमदार रेखाताई खेडेकर, प्रदेश महासचिव चंद्रशेखर शिखरे, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. अर्जुन तनपुरे, संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर, चितांगराव कदम सरोज देशमुख सविताताई कदम, सुरेश कदम, शे . रा . पाटील,ज्योतीताई शिखरे उपस्थित होते .