Uncategorized

ट्रकची अॅटोला धडक दोघांचा मृत्यु

एक जखमी : मृत महिलेची ओळख पटली, इसमाची ओळख अस्पष्ट

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192

विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने अॅटोला धडक दिल्याने यामध्ये अॅटोतील महिला व पुरुष जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी (ता.२) दुपारी दोन वाजता दरम्यान महागाव येथे घडली.

महागाव येथुन प्रवासी घेवुन निघालेल्या अॅटोला (क्र.एम एच १६एजे८८३०) महागाव शहरा नजिक असलेल्या पेट्रोल पंप जवळ उमरखेड कडून नागपुरकडे जाणाऱ्या सिजी ०८एए ९७७७ या भरधाव ट्रकने धडक दिली यामध्ये अॅटोतील एक महिला व एक पुरुष ट्रकच्या चाकाखाली येवुन अक्षरशः चेंदा मेंदा झाले. या अपघाताची माहिती


मिळताच महागाव पोलिसांनी घटना स्थळी धाव घेवून पंचनामा केला. मृतदेह चेंदामेंदा झाल्याने मृतकांच्या ओळख पटविण्याचा प्रश्न पोलिसांसमोर उभा झाला होता पोलिसांनी चौकशी केली असता सदर मृतक महिलेची ओळख पटून
तिचे नाव सत्वशिला रामा गायकवाड (वय७४ वर्ष) रा. लोहरा ता. महागाव असल्याची माहिती मिळाली तर मृत इसमाची अद्याप ओळख पटली नसल्याने त्याची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. या
अपघातात जखमी झालेल्या अॅटो चालक ज्ञानेश्वर ठोंबरे रा. कोठारी याला उपचारासाठी सवना ग्रामीण रुग्णालयात हलविले असुन अपघात ग्रस्त ट्रक व अॅटो पोलिस स्टेशनला जमा करण्यात येवून ट्रक चालक ओमप्रकाश बेदरकर याला अटक करण्यात आली असुन पुढील तपास महागाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक केशव पुंजरवाड, सागर अन्नमवार, सुरज काळे, नापोका वसीम शेख यांचेसह पोलिस कर्मचारी करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!