दर्पण पत्रकार संघटना ढाणकी ची नवनियुक्त कार्यकारीणी गठित.

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
पत्रकार दिनाच्या औचित्याने दरवर्षी पत्रकार संघाची नवनियुक्त कार्यकारणी गठीत केल्या जाते. ढाणकी शहरातील निर्भीड तथा अन्यायाला वाचा फोडणारा पत्रकार संघ म्हणून, दर्पण पत्रकार संघाची ओळख आहे. दर्पण पत्रकार संघाची २०२४ या वर्षाची नवनियुक्त कार्यकारी नुकतीच गठीत करण्यात आली असून, ही कार्यकारिणी दर्पण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय सलेवाड यांचे नेतृत्वात गठीत करण्यात आली. यामध्ये सर्वानुमते दैनिक नमो महाराष्ट्र प्रतिनिधी सुनील मांजरे हे अध्यक्षपदी, दैनिक युवा राष्ट्र दर्शन तथा दै.भास्करचे शेख इरफान उपाध्यक्षपदी तर दैनिक तरुण भारतचे दिगंबर बल्लेवार हे सचिव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. याबरोबरच आसिफ खान सहसचिव, विलास घोडे कोषाध्यक्ष, निरंजन नलगे संघटक, पवन वच्चेवार सहसंघटक म्हणुन निवड झाली. ही निवड डॉ. दिनेश जयस्वाल, प्रफुल चोरे, विकास चापके, मनोज राहुलवाड, गोपाल गौरवाड, या सदस्यांनी अविरोध केली. नवनियुक्त कार्यकारणी चे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.