ज्ञानोदय कॉम्प्युटर टायपिंगचा उत्कृष्ट निकाल.

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे मार्फत डिसेंबर – २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या कॉम्प्युटर टायपिंगच्या परिक्षेचा निकाल कालच जाहिर झाला आहे. शासनमान्य ज्ञानोदय कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्युट, उमरखेड या संस्थेतील विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश संपादन केले आहे. यात स्नेहा पुनेश्वर देवकते हिने ९९% गुण घेऊन यवतमाळ जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांमध्ये नाव नोंदवून, उमरखेड तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. योगेश गणेश पुरी याने ९६% गुण मिळवून व्दितीय क्रमांक मिळवला. निकीता पुनेश्वर देवकते ९४% गुण घेऊन उतिर्ण झाली. सायली गजानन कदम हिने ९३% गुण मिळविले. इंद्रजित अविनाश खंदारे हा ९२% गुण घेऊन उतिर्ण झाला तर प्रज्वल संजय हणवते व तनवि चंद्रशेखर कदम यांनी ९२% असे उत्कृष्ट गुण घेऊन उतिर्ण झाले आहेत.
ज्ञानोदय कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्युट च्या पुर्ण विद्यार्थ्यांपैकी ९० टक्के च्या वर गुण घेणारे १६ विद्यार्थ्यी तर ८० टक्के च्या वर गुण घेणारे ३० विद्यार्थ्यीं आहेत तसेच ७० टक्के च्या वर २७ विद्यार्थ्यांनी गुण घेऊन उतिर्ण झाले आहेत.
दर सत्राप्रमाणे याही सत्रात सर्वोत्कृष्ट निकालाची परंपरा अबाधीत राखत सर्व विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
ज्ञानोदय संस्थेचे संस्थाचालक शैलेश मुंगे सर व प्राचार्य अरविंद दोडके सर यांनी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.