बाळदी तांडा येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

शेख मुजाहिद ससंपादक मो. 7798306192
उमरखेड तालुक्यातील बाळदी येथे
3 जानेवारी 2025 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बाळदी तांडा व बाळदी येथे सावित्रीबाई फुले यांची 194 वी जयंती ‘बालिका दिन ‘म्हणून साजरी करण्यात आली.
श्रीमती नरवाडे मॅडम यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी सावित्रीच्या वेशभूषात तर विद्यार्थ्याने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषा येऊन त्यांच्या जीवनावर गीते गायली भाषणे सादर केली. त्यानंतर सर्व शिक्षकांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. सावित्रीबाईंनी आपला पती महात्मा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून लोकांचा त्रास सहन करून जे स्त्रियांसाठी खुप मुलाचे काम केले ते विद्यार्थ्यांना सांगितले.आणि जर सावित्रीबाई नसत्या तर आज मुली शिकल्या नसत्या असंही ते म्हणाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती नरवाडे मॅडम,प्रमुख पाहुणे म्हणून निता दुधे मॅडम, श्रीमती मीराताई राठोड मॅडम, लताबाई देशमाने, श्री यशवंत सर,श्री गायकवाड सर,श्री बेटेवार सर,श्रीमती रोळे मॅडम,कैलास पाटील सर इत्यादी उपस्थित होते.