बहुरूपी कला लुप्त होत चाललीयेणाऱ्या भावी पिढीला या कलेच्या आनंदापासून मुकावे लागेल

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
डिजिटल इंडिया शायनिंग इंडिया या इंटरनेटच्या जमान्यात बहुरूपी कला लुप्त होत चालली आहे. सरकारने या कलाकारांच्या कलेची दखल घेतली नाही. व तसेच करमणुकीच्या वेगवेगळ्या साधनांमुळे भावी पिढीनेही पाठ फिरवली महाराष्ट्रात लोक कलाकारापैकी एक पूर्वीच्या काळी जेव्हा गाव वस्त्यावर करमणुकीचे पर्याय मर्यादित होते. तेव्हा हे कलाकार कोणाची तरी हूबेहुब. नक्कल करून लोकांना रिझवत असत. हे बहुरूपी प्रामुख्याने फौजदार हनुमान शंकर यांचे वेश धारण करून गाव गावभर फिरत ती रूपे पाहून गावातील लोक त्यांना धान्य पैसा वगैरे देत परंतु आता चित्रपटगृह मोबाईल करमणुकीचे साधने वाढल्यामुळे आणि नवीन पिढीला या गोष्टीची माहिती नसल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे आणि बरेच वेळा शहरात फौजदारा ची कला सादर करते वेळेस फसवे गिरी किंवा भामटे समजून लोकांच्या रोशालाही सामोरे जावे लागते. या कलाकाराशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले आता आम्ही आमच्या लेकरांना चांगले शिकविणार वडिलांचे आणि आमचे कसेबसे भागले पण आता पुढे ते शक्य नाही. आता काळ बदलला आहे आमच्या कलेची किंमत राहिली नाही. आम्ही केले ते आता लेकरं करणार नाही. असे त्यांनी सांगितले