Uncategorized

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज वसंत सहकारी साखर कारखान्याचे साखर पुजन व भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन

  • वसंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अजय देशमुख सरसमकर
    यांची माहिती
    उमरखेड- महागाव, दि.९

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

मराठवाडा आणि विदर्भातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कामधेनु म्हणून ओळख असलेल्या वसंत सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ गाळप हंगामातील साखर पुजन व भव्य शेतकरी मेळाव्याचे बुधवार, दि. १० जानेवारी २०२४ रोजी दु. १२.०० वा. आयोजित करण्यात आले आहे. राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडणार असून या शिवसैनिकांच्या मेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती वसंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अजय देशमुख सरसमकर यांनी दिली.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांताताई पाटील यांची उपस्थिती राहणार असून, मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजयजी राठोड, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री तथा शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर, हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील, खासदार भावनाताई गवळी, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी मंत्री माधवराव पाटील किन्हाळकर, माजी मंत्री सुरेश नवले, माजी खासदार अॅड.शिवाजीराव माने, शिवसेनेचे संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांची विशेष उपस्थिती राहणार आहे तर,
प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार नामदेवराव ससाणे, आमदार इंद्रनील नाईक, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार निलयभाऊ नाईक, आमदार भीमराव केराम, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार बालाजी कल्याणकर, साखर आयुक्त, पुणे चंद्रकांत फुलकुंडवार, माजी आमदार रामराव वडकुते, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार गजानन घुगे, माजी आमदार उत्तमराव इंगळे, माजी आमदार विजय खडसे, माजी आमदार राजेंद्र नजरधने, टोकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड.शिवाजीराव जाधव, भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर, भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर, पुसद भाजप जिल्हाध्यक्ष महादेव सुपारे, संध्याताई प्रफुल्ल राठोड. माजी जि.प.सदस्य चितांगराव कदम, माजी अध्यक्ष, व.स.सा. कारखाना तातु देशमुख, माजी अध्यक्ष, व.स.सा. कारखाना अॅड.माधवराव माने, शिवेश्वर नागरी सह. बँकेचे अध्यक्ष शिवदास बोड्डेवार, डॉ.बी.एन.चव्हाण, माजी उपाध्यक्ष, न.प. उमरखेडचे नितीन माहेश्वरी, शिवसेनेचे यवतमाळचे जिल्हाप्रमुख श्रीधर मोहड व पुसदचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमाकांत पापीनवार यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती वसंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अजय देशमुख सरसमकर यांनी दिली असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या शेतकरी मेळाव्यास सहभागी व्हावे असे आवाहन हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!