दिव्यांग लाभार्थी घरकुलापासून वंचित

रिपब्लिकन सेनेची गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी
शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उमरखेड तालुक्यातील मौ. तिवडी (नवी) येथील दिव्यांग (मराठा – कुणबी) ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या लाभार्थी सौ. मालुताई रंगराव सोनटक्के ह्या घरकुल योजनेचा लाभ मिळविण्यासाठी २०१६ पासून सातत्याने संबंधित विभागाकडे पाठपुरावा करीत असून २०१६ रोजीचा ग्रामपंचायत तीवडी (नवी) यांचा घरकुल मिळणे संदर्भात ठराव सुद्धा पंचायत समिती उमरखेड कार्यालयास देण्यात आला होता. त्यानुसार अनुक्रमे त्यात नमूद अशा ०२ लाभार्थ्यांना लाभ मिळाला असून सदर लाभार्थी हा अद्याप घरकुलापासून वंचित राहिल्याची बाब रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकारी यांच्या निदर्शनास आल्यानंतर सामाजिक बांधिलकी जपत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदना मार्फत उपेक्षित लाभार्थी हि दिव्यांग स्त्री असून त्यांचे राहते घर कुडा – मातीचे आहे व पूर्णतः मोडकळीस आले असल्याकारणाने क्षतीग्रस्त होऊन जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे. तसेच शासन निर्णयानुसार दिव्यांग, अंध, विधवा, परितकता, घटस्फोटीत व निराधार यांना घरकुल योजनेमध्ये प्रथम प्राधान्य मिळावे असे परिपत्रक असून सुद्धा ०८ वर्षाच्या पाठपुराव्या नंतरही सदर लाभार्थी ह्या वंचित राहिलेल्या असून आपल्या स्तरावर योग्य ती चौकशी करून मौ. तिवडी (नवी) येथील अनुक्रमे (मराठा – कुणबी) ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या सौ. मालुताई सोनटक्के, रंगराव, सोनटक्के, योगेश सोनटक्के, शेषेराव सोनटक्के, उत्तमराव लक्ष्मण सोनटक्के, संतोष सोनटक्के, मारोती सोनटक्के, जीवन सोनटक्के, लक्ष्मण सोनटक्के, दत्ता सोनटक्के, शिवाजी सोनटक्के, गजानन सोनटक्के
या वंचित लाभार्थ्यांना तात्काळ घरकुलाचा लाभ मिळवून देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, ता. अध्यक्ष गौतम नवसागरे ता. उपाध्यक्ष भीमराव खंदारे, ता. कार्याध्यक्ष साहेबराव कदम, शहर संघटक नंदू इटकरे, शहर सहसचिव प्रभाकर पाईकराव व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.