उमरखेड आगाराच्या वाहकाचा व चालकाचा असाही प्रामाणिकपणा [दागिन्यासह रोख रक्कम असलेली पर्स केली परत ].

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उमरखेड : एकीकडे पैसा कमावण्यासाठी माणसाकडून वाटेल त्या मार्गाचा अवलंब केल्या जात असल्याच्या अनेक घटना पुढे येत आहेत परंतु समाजामध्ये अजूनही प्रामाणिकपणा कायम असल्याचा प्रत्यय राज्य परिवहन महामंडळाकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारावर चालक व वाहक म्हणून उमरखेड आगारात काम करणाऱ्या वाहक कर्मचारी नलकुळवड व चालक कर्मचारी कऱ्हे यांनी बस मध्ये सापडलेली पर्स ज्याची होती त्याला परत दिल्याच्या घटनेने आणून दिला बस मध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची रोख पंधराशे रुपये व सोन्याचे दागिने असलेली एकूण 75 हजार रुपयाची पर्स बस मध्ये विसरून राहिलेली होती ती पर्स आगार व्यवस्थापक प्रमोदिनी किनाके यांच्या हस्ते ज्याची होती त्याला परत करून राज्य परिवहन महामंडळाच्या उमरखेड आगाराच्या शीरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याची घटना दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी ७:१५ वाजताचे दरम्यान घडली. उमरखेड आगाराची बस फेरी क्रमांक ९३६५ इसापूर ते उमरखेड मार्गावर धावत असताना बसमध्ये सकाळी ७:१५ चे दरम्यान बस मध्ये एक पर्स आढळून आली पर्स ची तपासणी केली असता पर्समध्ये १५०० रुपये रोख व दागिने आढळून आली होती सदर बसचे चालक व वाहक यांनी रोख रक्कम व दागिने असलेली पर्स आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके यांच्या हस्ते ज्याची पर्स होती त्या प्रवाशाला पर्स परत केली यावेळी रोख रक्कम व दागिने असलेली पर्स परत मिळाल्याचे पाहून सदर प्रवाशांनी आगार प्रमुख यांच्या उपस्थितीत चालक व वाहक यांचा शाल व श्रीफळ देऊन यावेळी सत्कार केला दागिने व रोख रक्कम असलेली पर्स उमरखेड आगाराच्या चालक व वाहकांनी प्रामाणिकपणे परत केल्याच्या घटनेने प्रवासी वर्गातून व राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यातून सदर बसच्या चालक व वाहकावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. याप्रसगी प्रकाश भदाडे, सरस्वती पाटील मॅडम बापुराव चिरंगे बाबु. उपस्थीत होते.