Uncategorized

फिर्यादिस मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करून बडतर्फ करा

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव येथील फिर्यादी राघोजी माधव दारमोडे हे दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी पोफाळी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देण्यासाठी गेलो असता तेथील कर्मचारी नाना मस्के यांनी फिर्याद न घेता नाहक मारहाण करून फिर्यादीचा कानाचा पडदा फाटला असल्याने त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही होणे बाबत दिनांक 18एप्रिल रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक यांचेकडे तक्रार करण्यात आली.

त्या तक्रारी च्या अनुषंगाने माहिती अधिकारात माहिती मागितली असता संबंधित ठाणेदार यांनी दिनांक 11 जुलै रोजी देण्यात आलेल्या पत्रात सदर तक्रारवर चौकशी सुरू आहे असे पत्र काढून माहिती पुरविली तक्रारदाराचे समाधान न झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे अपील सादर करून दिनांक 7 ऑगस्ट रोजी सुनावणी पार पडली असता तात्काळ चौकशी पूर्ण करून माहिती देण्याचे आदेश काढण्यात आले

दिनांक 9 ऑगस्ट रोजी फिर्यादी यास पोलीस स्टेशनमध्ये बयाण घेणे संदर्भात बोलवले असता फिर्यादीचे मनमानी पद्धतीने बयान घेण्यात आले असल्याने फिर्यादीने सही करण्यास नकार देऊन दुरुस्ती करा असे सांगितल्याने सध्या प्रिंटर बंद आहे याचे कारण दाखवून आपण पुन्हा बयान घेऊ असे म्हणून परत पाठवण्यात आले. दिनांक 22 ऑगस्ट रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्याल्यातून मिळालेल्या अपील अर्जासंदर्भात माहिती मिळाली असता त्यामधे योग्य ती दखल घेऊन कारवाई न करता घटनेचा सर्व प्रकार तेथील सिटी टीव्ही मध्ये असून व फिर्यादी सोबत असलेल्या दोन पंचा समक्ष घडला असताना सुद्धा याची योग्य ती दखल न घेता फिर्यादीची खोटी सही मारून वरिष्ठाची दिशाभूल करून संबंधित कर्मचारी यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. असल्याचा प्रकार माहिती अधिकारातून मिळाल्या माहितीमध्ये दिनांक 22 ऑगस्ट रोजी उघड झाला असल्याने या प्रकरणाची योग्य ती दखल घेऊन आपल्या स्तरावर उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावर तात्काळ फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात यावे.

या प्रकरणाची खोटी चौकशी करून वरिष्ठाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी या बाबत दिनांक 23 ऑगस्ट रोजी राघोजी माधव दारमोडे

यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्याकडे तक्रार करण्यात आली.नव्याने रुजू झालेले जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून कारवाई करतील, का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार

  • फिर्यादिस मारहाण

करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पोफाळी ठाणेदार यांचे कडून खोटे बयान सादर करून बचाव करण्याचा प्रयत्न केला. पोफाळी पोलीस

स्टेशनमध्ये फिर्याद देण्यासाठी गेलो असता तेथील कर्मचारी नाना मस्के यांनी फिर्याद न घेता नाहक मारहाण करून फिर्यादीचा कानाचा पडदा फाटला असल्याने त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही होणे बाबत दिनांक 18 एप्रिल रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक यांचेकडे तक्रार करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!