सामाजिक

कमलनयन बजाज हॉस्पिटलचे प्रसिद्ध हृदयविकार तज्ञां कडून कळमनुरीत ५०० रुग्णांची तपासणी


३०० च्या जवळपास रुग्णांची टुडी इको तपासणी


शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिबीराचे आयोजन कळमनुरी चे माजी उपनगराध्यक्ष मो नाजीम रजवी यांनी केले होते
कळमनुरी येथील वुमन्स हॉस्पिटल मध्ये दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी कमलनयन बजाज हॉस्पिटलचे औरंगाबाद चे प्रसिद्ध हृदयविकार तज्ञ हृदयाचे विकार असलेल्या रुग्णाची तपासणी हृदयविकार तज्ञ डॉक्टर सचिन मुखेडकर डॉक्टर महेश केदार डॉ महेंद्रसिंग परीहार यांनी शिबिरात आलेल्या ५०० च्या जवळपास रुग्णाची तपासणी केली तर ३०० च्या जवळपास रुग्णाची टुडी इको ची तपासणी करण्यात आली आहे सदरील शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला आहे या वेळी औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हॉस्पिटलचे प्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉक्टर सचिन मुखेडकर डॉक्टर महेश केदार डॉ महेंद्रसिंग परिहार यांचे


सत्कार कळमनुरी चे माजी उपनगराध्यक्ष मो नाजीम रजवी यांची केली त्या प्रमाणे या ठिकाणी आलेल्या रुग्णांनी हि या तज्ञ डॉक्टरांचे सत्कार केले आहे
सदरील शिबिर यशस्वी करण्याकरिता आवेस पठाण शोहीब बागवान यासिन कुरेशी इरफान पठाण शेख साजिद मो संकलैन रजा शेख नजीब शेख मुजु यांच्यासहित आदींनी सहकार्य केले आहे त्याचप्रमाणे यावेळी कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर पंचलिंगे डॉक्टर नावेद डॉक्टर सोफिया खान ऐ सी जी व रक्त तपासणी बि पी साठी यांनी सहकार्य केले आहे


त्याचप्रमाणे कमलनयन बजाज हॉस्पिटल औरंगाबाद एमआयटी हॉस्पिटल औरंगाबाद या ठिकाणी १ ऑगस्ट २०२४ ते १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत मोफत एन्जोप्लास्टी बायपास सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आलेला आहे या मध्ये शिबिरात आलेल्या रुग्णाची एन्जोप्लास्टी डॉ सचिन मुखेडकर व बायपास वाल ची सर्जरी डॉ महेश केदार लहान मुलाची सर्जरी डॉ महेंद्रसिंग परिहार हे करीत आहे या शिबिरात जास्तीत जास्त रुग्णांनी आपली तपासणी करून घ्यावे असे आवाहन कळमनुरी चे माजी उपनगराध्यक्ष मो नाजीम रजवी यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!